योगेश्वरी देवल कमेटी पत्रकार परिषदेत करणार मोठा गौप्यस्फोट ; आत्ताच या कर्मचाऱ्यांना का होतो त्रास ?

सब टायटल: 
दोन कोटी रुपयांचा निधी मंदिराला कसा मिळाला त्याचाही तपशील देणार ;दररोज सुरू असलेल्या अन्नदानाचेही सांगणार गुपित
Rajkiya

.

         अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

योगेश्वरी देवल कमेटीच्या चार कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे ?अशी बातमी काल मराठवाडा दर्पणने दिली होती त्या राजीनाम्याची पुष्टी झाली असून कर्मचाऱ्यांच्या राजीनामे देण्यामागील गुढ काय ? यासह अनेक मुद्द्यावर तपशीलवार माहिती योगेश्वरी देवल कमेटीचे सचिव सह सर्व ट्रस्टी पत्रकार परिषदेत गौप्य स्फोट करणार असल्याची माहिती हाती येत असून लवकरच पत्रकार परिषदेचेही आयोजन केले जाणार असल्याचे समजते 

         योगेश्वरी देवल कमेटीवर नुकतेच नवीन ट्रस्ट नियुक्त करण्यात आले आहेत उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्षाच्या निवडी झाल्यानंतर अनेक अमुलाग्र बदल करण्यात आले इथे नुसता नाश्ता दिला जायचा आता अन्नदान केले जात आहे आज नाष्टा व अन्नदान करूनही नाश्त्यासाठी लागणाऱ्या खर्चाची किती रक्कम जास्तीची होती त्या संदर्भातही पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे विशेष म्हणजे देवल कमेटीला मिळालेले दोन कोटीचा निधी कसा व कोणी मिळवून दिला त्याचाही तपशीलवार खुलासा सचिव करणार असल्याचे समजते 

       अचानक चार कर्मचाऱ्यांनी राजीनामे का दिले ? यासंदर्भात कानोसा घेतला असता ट्रस्टी असलेला कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक व्यवहार पाहतो मात्र लेखापरीक्षणामध्ये अनेक अनियमितता तसेच उत्पन्नात नवीन ट्रस्टी येताच दुपटीने वाढ तसेच इतरही गंभीर प्रकरणे समोर आल्याचे समजते विशेष म्हणजे दानशूर व्यक्तींना देवीचा फोटो भेट दिला जायचा त्या पाठीमागे स्वतःचा मोबाईल नंबर सदरील कर्मचारी द्यायचा आता या कर्मचाऱ्यांच्या नावे ऑनलाईन दान किती जमा झाले याचाही तपशील घेतला जात असल्याची माहिती हाती येत आहे योगेश्वरी देवस्थानची ऐन मोक्यावर दहा ते बारा एकर जमीन आहे त्या जमिनी संदर्भातही निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते योगेश्वरी देवल कमेटीच्या वतीने पत्रकार परिषदेत आणखीन काय काय गौप्यस्फोट केले जातात याकडे अंबाजोगाई शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे