योगेश्वरी देवल कमेटीच्या कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांनी दिले राजीनामे ?

सब टायटल: 
राजीनामा देण्यामागील कारण समोर न आल्याने वाढतोय संभ्रम
Rajkiya

.

      अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

योगेश्वरी देवल कमेटीवर आपलेच वर्चस्व असावे यासाठी शहरातील दोन राजकीय नेते प्रयत्नशील होते मात्र त्यात माजी नगराध्यक्ष मोदी यशस्वी झाले काल अचानक देवल कमेटीच्या प्रशासकीय कामकाज पाहणारे कार्यालयातील चार कर्मचाऱ्यांनी अचानक ट्रस्टीकडे राजीनामे दिले असल्याचे समजते. कर्मचाऱ्यांच्या राजीनामा देण्यामागील कारण काय हे मात्र अजून समजू शकले नाही त्यामुळे भक्तामध्ये संभ्रम वाढतोय 

          योगेश्वरी देवल कमेटीचे पदसिद्ध अध्यक्ष हे तहसीलदार आहेत इतर पदाधिकाऱ्याच्या निवडी झाल्यानंतर सर्व काही अलबेल सुरू होते दोन कोटी रुपयांचा निधी देवल कमेटीच्या विकास कामासाठी आला तो कोणी आणला यावरून समाज माध्यमावर उलट सुलट चर्चा सुरू असताना देवल कमेटीतील चार कर्मचाऱ्यांनी अचानक राजीनामे दिले असल्याचे समजते या कर्मचाऱ्यात एका ट्रस्टीचाही समावेश असल्याची माहिती आता मिळत आहे ट्रस्टी व कर्मचाऱ्यात नेमका कोणत्या मुद्द्यावर बेबनाव झाला तो राजीनामा देण्याच्या पर्यंत आला नेमके मतभेदाचे मुद्दे काय आहेत या बाबतीत अद्याप माहिती समोर आलेली नाही यासंदर्भात राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांची बाजू समजलेली नाही