योगेश्वरी देवल कमेटीला दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
योगेश्वरी देवल कमेटीला राज्याच्या पर्यटन खात्याकडून दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची प्रेस नोट माजी नगराध्यक्ष मोदींच्या वतीने काढताच हा निधी मिळावा यासाठी विद्यमान आमदारांच्या वतीने दिलेले पत्र तसेच पर्यटन खात्याने त्या त्या वेळी आमदार मुंदडाचा संदर्भ देत वरिष्ठांना दिलेली प्रशासकीय पत्र सोशल मीडियावर टाकल्याने हा निधी भाजपाचे आमदार नमिता ताई मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे मिळाला अशीच चर्चा जनतेतून होत आहे
अंबाजोगाईच्या राजकारणाचे एक खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोणीही प्रमुख राजकीय नेते कधीही निधीची मंजुरी असो नाही तर आपली बाजू जनतेला कळावी यासाठी कधीही पत्रकारांसमोर येत नाहीत एकतर आरोप प्रत्यारोप करत नाहीत आणि केला तर त्याचे उत्तर दुसरा नेता पत्रकार परिषद घेऊन देत नाही एका ग्रुपने प्रेस नोटच्या माध्यमातून दावा केला तर दुसरा ग्रुप सोशल मीडियावर आपली बाजू मांडत असतो सध्या योगेश्वरी देवल कमेटीवर माजी नगराध्यक्ष मोदी हे स्वतः आहेत तसेच इतर सदस्य व पदाधिकारी त्यांच्या विचाराचे आहेत या कमेटीमध्ये अपवाद फक्त आमदारांचा आहे
मोदी यांनी प्रेसनोट काढत योगेश्वरी मंदिर व परिसर विकास कामासाठी पर्यटन खात्याकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजुरी मिळाली असून शासन स्तरावर मोदी यांनी अथक परिश्रम करत पाठपुरावा केला असल्याचा दावा केला तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही हा निधी मिळावा यासाठी शिफारस केल्याचा दावा करण्यात आला आहे विशेष म्हणजे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही यासाठी अथक प्रयत्न केल्याचा उल्लेख प्रेस नोट मध्ये आहे
दुसरीकडे योगेश्वरी मंदिर परिसरातील विकास कामासाठी पर्यटन खात्याच्या मार्फत निधी मिळावा यासाठी केलेला पत्रव्यवहार आमदाराच्या वतीने सोशल मीडियावर टाकल्याने त्यांची बाजू सध्या तरी योग्य वाटते माजी नगराध्यक्ष मोदींनी पत्रकार परिषद घ्यायची नाही तर किमान पालकमंत्र्यांनी केलेल्या शिफारशीचे पत्र सोशल मीडियावर टाकावयास हवे मग जनता ठरविल हा निधी मिळवण्यासाठी कोणी कोणी प्रयत्न केला