बीड जिल्ह्यात एकच चर्चा सुरू पवार गटाचे तिकीट कोणाला ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
बीड लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अटीतटीची निवडणूक झाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे निवडणुकीत विजयी झाले सर्व सामान्य मतदारांनी ठरवले तर राजकारणात बदल घडू शकतो हा विश्वास मतदारांचा आत्मविश्वास वाढवत असल्याचे दिसत आहे त्यामुळे की काय कोण जाणे आज बीड जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे तिकीट कोणाला मिळणार तो निवडून येऊ शकतो दुसरीकडे काँग्रेस, दोन्हीही शिवसेनेच्या वतीने कोण इच्छुक या नावाची कोणीही चर्चा करत नाही त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार आपल्याला शरद पवार गटाचे तिकीट कसे मिळेल यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे
शितावरून भाताची परीक्षा सतत घेतली जाते बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहा विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय काय परिस्थिती सुरू आहे कोण कोणाकडून इच्छुक आहेत मतदार राजा निमूटपणे पाहत आहे बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर सध्या सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती केज विधानसभा मतदारसंघाची विशेष म्हणजे बीड लोकसभेला भाजपाचा पराभव झाल्यानंतर भाजपात एक प्रकारे मरगळ आल्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे पंकजाताईंना विधान परिषदेवर संधी दिल्यानंतर मुंडे समर्थाकात समाधान व्यक्त केले जात आहे मात्र पंकजाताईंना मंत्रिमंडळात समावेश केला जाईल असे भाजपकडून आश्वासित केले होते त्यावर कोणीच ब्र शब्द बोलायला तयार नाही त्यामुळे बीड जिल्ह्याच्या भाजपात सध्या तरी स्मशान शांतता असल्याने कोणीही विधानसभे संदर्भात चर्चा करत नसल्याचे समजते
बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातून भाजपाचे तिकीट आपल्यालाच मिळणार किंवा तिकीट मिळावे म्हणून कोणीही इच्छुक उमेदवार फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न किंवा दावा पुढे येऊन करायला तयार नाही भाजप तर राष्ट्रीय पक्ष आहे देशात व राज्यात सत्तेत असणारा पक्ष आहे तरीही कोणी दावा करायला तयार नाही दुसरा राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्ष आहे देशात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पक्षाची देशात प्रतिमा पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला चेहरा नाही महाराष्ट्राचे जाऊ द्या बीड जिल्ह्यात गांधी घराण्याच्या निष्ठावंत खासदार रजनीताई पाटील आहेत जिल्ह्यात इतर मतदारसंघात जाऊ द्या केज विधानसभा मतदारसंघात दावा करायचे म्हटले तर काँग्रेस पक्षाकडे उमेदवार नाही केज शहरात सुद्धा काँग्रेस पक्षाची ताकद निर्माण करता येऊ नये यामुळे पक्षाची ही दयनीय अवस्था जिल्ह्यात झाली ही सत्यता कोणीही नाकारू शकत नाही केज मध्ये खासदार बजरंग सोनवणे, रमेश आडसकर, मुंदडा, इनामदार यांनी आपले आपले गड शाबूत ठेवू शकले मात्र पक्षाची ताकद पाठीशी असूनही जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कमकुवत बनला अशी सतत चर्चा होते
पवार गटातर्फे साठे ,ठोंबरे की घाडगे ?
बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची जी अवस्था आहे तशीच अवस्था केज मतदार संघात माजी आमदार साठेची असल्याची सतत चर्चा होत आहे पक्षाची ताकद मा आ साठे यांच्या पाठीशी असूनही तसेच शरद पवार ,सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद पक्षाचा खासदार जिल्ह्यात निवडून आला मात्र माजी आमदार साठे यांना आपला केज विधानसभा मतदारसंघात म्हणावा तसा दबदबा निर्माण करता आला नाही ही सत्यता कोणीही मान्य करेल आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या माजी आमदार प्राध्यापक संगीताताई ठोंबरे, यांनी थेट शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली वाढदिवसानिमित्त पोस्टरवर शरद पवार गटाच्या नेत्याचे फोटो झळकले केज मतदार संघाच्या निवडणुकी अगोदरच माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांनी मतदारसंघात राजकीय वातावरण निर्मिती केली मात्र काल झालेल्या केज येथील शरद पवार गटाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केजच्याच अंजली ताई घाडगे यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करत व्यासपीठावर हजेरी लावल्याने आता केज विधानसभेची संभाव्य उमेदवारी केज मतदार संघातून शरद पवार गटाची कोणाला असा प्रश्न निर्माण झाला असून माजी आमदार साठे, प्राध्यापक संगीताताई ठोंबरे की अंजलीताई घाडगे ? अशी मतदारसंघात सध्या जोरात चर्चा सुरू आहे पक्ष काय निर्णय घेतो याकडे मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे