महसूल दिन कार्यक्रमाकडे राजकीय नेत्यांनी पाठ का फिरवली ?

.कधी नव्हे ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी दरवर्षी महसूल खाते महसूल दिन साजरा करते त्यादिवशी जिल्ह्यातील महसूल खात्यातील अधिकारी ,कर्मचारी यांना उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते यावेळी जिल्हाधिकारी यांनी हा कार्यक्रम अंबाजोगाई येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री पासून खासदार, आमदार हे निमंत्रित होते महसूल खात्याचे सर्व अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते राजकीय नेते आता येतील नंतर येतील म्हणून बराच वेळ महसूल अधिकाऱ्यांनी वाट पाहिल्यानंतर नाईलाजास्तव महसूल खात्याने उपस्थित अधिकाऱ्यांना प्रमुख पाहुणे करत त्यांचे हस्ते पुरस्कार प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित केले अंबाजोगाईच्या महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाकडे पालकमंत्री पासून ते सर्व आमदार खासदारांनी पाठ का फिरवली ? अशी चर्चा होत आहे नेमके कारण काय जोपर्यंत राजकीय नेते याचा खुलासा करणार नाही तोपर्यंत सत्य काय आहे ते कळणार नाही