आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान अंबा, केज शहरावर पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
मांजरा धरणातील पाण्यावर आंबेजोगाई, केज, धारूर कळंबसह लातूर शहरातील जनतेची तहान भागते मात्र आजच्या घडीला मांजरा धरणात फक्त दोन 2.32% च पाणी साठा शिल्लक असल्याचे समजते आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान अंबा, केज शहरावर पाणीटंचाईचे संकट येण्याची शक्यता दिसते विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा, माजी नगराध्यक्ष मोदी अंबाजोगाई नगरपरिषद प्रशासनाकडून या पाणीटंचाई संदर्भात आढावा घेतील का ? असाही जनतेतून सवाल केला जातो आहे पाहू या लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात ते
अंबाजोगाई नगर परिषदेवर सध्या प्रशासक आहे केज विधानसभा मतदारसंघात केज व अंबाजोगाई हे दोन प्रमुख शहरे येतात मांजरा धरणात अत्यल्प पाणी साठा शिल्लक आहे आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान पाणी संकट अंबाजोगाई शहरावर येण्याची शक्यता दिसत आहे त्यावेळी आचारसंहिता लागू असेल त्यामुळे आमदारांची इच्छा असूनही काही करता येणार नाही आज संधी आहे आमदार मुंदडा यांनी नगरपरिषद प्रशासनाची पाणीटंचाईचे संदर्भात आढावा बैठक घेऊन पाणी वितरणा संदर्भात योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या तसेच पाण्याचे योग्य नियोजन केले तर आगामी पाणीटंचाईचा काळ टाळता येऊ शकेल आमदारांनी भूमिका घ्यावी अशी ही जनतेतून मागणी होत आहे बघू या आमदार काय भूमिका घेतात ते
दुसरे राजकीय नेते माजी नगराध्यक्ष पापा मोदी आहेत ते पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत ते सतत अंबाजोगाई शहरातील जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा वरिष्ठ नेतृत्वाकडे करत आपली राजकीय पोळी भाजून घेतात स्वतःचा इगो हार्ट झाला की आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना नगरपरिषद प्रशासनाकडे जाऊन आढावा बैठक घेतात आज अंबाजोगाई शहरातील पाणीपुरवठा वितरित करण्यासाठी त्याकाळी नेमलेली एजन्सी आहे त्याच्या निष्काळजीपणामुळे अंबाजोगाई शहरातील जनतेसाठी आलेला पाणीपुरवठा लाखो लिटर पाणी वाया लिकेजमार्फत जात आहे पाणीटंचाईचे अंबाजोगाई शहरावर सावट येण्याची शक्यता आहे आपण या शहरातील जनतेवर राजकीय दावा करता मग या शहरातील जनतेसाठी पाणीटंचाईच्या पूर्व तयारीसाठी काय भूमिका घेणार ? अशीही चर्चा जनतेतून होताना दिसत आहे बघू या मोदी काय भूमिका घेतात ते