बीड जिल्हा हादरला स्वाईन फ्लूने साकुड येथील रूग्णाचा मृत्यू

सब टायटल: 
पाच वर्षांतील“स्वाईन फ्लू'ची पहिली घटना आरोग्य यंत्रणेकडून सर्वेक्षण
Arogya Shikshan

.

            अंबाजोगाई (प्रतिनिधी)

     स्वाइन फ्लूने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील साकुड या गावी उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. रावसाहेब रामचंद्र चाटे (वय ६५ वर्षे) असं मयत व्यक्तीचे नांव आहे.

         अंबाजोगाई तालुक्यातील साकुड मध्ये हा रूग्ण सापडला असुन या गावाचे आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पाच वर्षांत स्वाईन फ्ल्यूचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. पंढरपूर वरून वारी करून परत आल्यानंतर आजारी पडल्याने अंबाजोगाई येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेताना रावसाहेब रामचंद्र चाटे यांचा मृत्यू झाला. अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच दि.१७ जुलै रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु, लक्षणे पाहता येथील डॉक्टरांनी त्यांचे नमुने घेत छत्रपती संभाजीनगर येथे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा १ ऑगस्ट रोजी बीडच्या आरोग्य विभागाला रिपोर्ट मिळाला. त्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. अंबाजोगाई तालुक्यातील साकूड गावात आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करत कोणाला लक्षणे आहेत का ? याची माहिती घेतली जात आहे. दरम्यान या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की या रूग्णाला स्वाईन फ्लूची लागण ही बाहेर झालेली होती. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याचा रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आलेला होता. त्यानंतर रूग्णाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असून पाच वर्षांतील ही पहिली घटना असल्याची माहिती दिली आहे.

आरोग्य पथकाने केली तपासणी 
      - डॉ बालासाहेब लोमटे 

      अंबाजोगाई तालुक्यातील साकुड या गावातील नागरिकांशी संवाद साधून परिसराची पाहणी केली कुठेही लक्षणे आढळून आलेली नाहीत त्यामुळे काळजीचे कारण नाही असेही तालुका आरोग्य अधिकारी लोमटे यांनी    सांगितले