अंबाजोगाई तालुक्यातील जि. प.च्या शाळेमध्ये गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसताना विद्यार्थी उत्तीर्ण झाले कसे ?

सब टायटल: 
शिक्षण विभागाला आज जाग आली ;सहा शिक्षकांना बीडला कागदपत्रची छाननीसाठी बोलावले
Arogya Shikshan

.

        अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

          बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत काय अवस्था आहे माहित नाही मात्र अंबाजोगाई तालुक्यातील काही शाळांचा अपवाद वगळला तर गेली अनेक वर्षापासून गणित व विज्ञान हा विषय शिकवण्यासाठी शाळेत शिक्षकच नाही असे असताना या शाळेतील विद्यार्थी दोन विषयात चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या यशाचे गमक काय ? असा शिक्षण प्रेमीतून सवाल उपस्थित केला जात आहे 

            साध्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपासून थेट लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान तसेच इतर वेळा सतत जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा घडत असतात फक्त नाल्या रस्ते शासनाच्या विविध योजना आणल्या की विकास झाला असे समजायचे का ? विकास प्रत्येक क्षेत्राचा समान विकास होणे अपेक्षित असते मात्र सामाजिक राजकीय सांस्कृतिक क्षेत्रातील समस्यावर सतत चर्चा होतात उपाययोजनाही होतात मात्र जो क्षेत्र समाजाची पिढी घडवतो त्या क्षेत्रातील शैक्षणिक समस्येवर ना पुढारी ना लोकप्रतिनिधी ना जनता कोणीच ब्र शब्द बोलायला तयार नाही त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गेली अनेक वर्षापासून गणित व विज्ञान या विषयाला शिकवण्यासाठी शिक्षक नाही यावर कोणीही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य गावचे स्थानिक पातळीवरचे पुढारी कोणीच आवाज उठवत नाही हे अंबाजोगाई तालुक्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल अशी ही चर्चा होत आहे 

            राडीच्या घटनेने पडला प्रकाशझोत 

            अंबाजोगाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एकाही खाजगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत गणित व विज्ञान शिकवणारा शिक्षक नाही असे नाही मात्र जिल्हा परिषदेच्या काही शाळांचा अपवाद वगळता गेली अनेक वर्षापासून गणित व विज्ञान हा विषय शिकवण्यासाठी किमान बीएससी बीएड शिक्षक असणे आवश्यक आहे तोच शिक्षक या दोन्ही विषयाला शिकवू शकतो शिक्षक नसूनही विद्यार्थ्यांनी या दोन विषयाचा अभ्यास करून आज पावतो त्या त्या शाळेचे विद्यार्थी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर परीक्षेत उत्तीर्ण झाले असेच म्हणावे लागेल 

                        अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी महिन्याभराच्या सुट्टीवर गेल्याने जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तात्पुरता पदभार केजचे गटशिक्षणाधिकारी बेडस्कर यांना अंबाजोगाईचा पदभार दिला होता बेडस्कर यांनी आपल्या तोंडी आदेशान्वये राडी शाळेतील जोशी नामक गणित शिकवणाऱ्या शिक्षकाला तोंडी आदेशाने आवसगाव या शाळेवर पाठवले होते राडी गावच्या गावकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी शाळेतील मुलांना घेऊन अंबाजोगाईच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवताच हा प्रकार उघडकीस आला तात्काळ त्या शिक्षकाला मूळ राडी या शाळेत होण्याचे आदेश देण्यात आले तात्पुरता पदभार असताना आणखीन अंबाजोगाई तालुक्यातील दोन शिक्षकांना बेडस्कर यांनी तोंडी आदेश देऊन प्रतिनियुक्तीवर पाठवले असल्याची माहिती पुढे येत आहे खरे काय खोटे काय त्यांनाच माहीत गणित व विज्ञान विषयासाठी बीएससी बीएड असणाऱ्या शिक्षकांना कागदपत्रासह आज बीडला जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले आहे सहा शिक्षक कागदपत्रे घेऊन बीडला गेल्याचे ही समजते यातून आता निवड किती जणांची होते पहावे लागेल मात्र अजूनही अनेक शाळांमध्ये दोन विषय शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय ? असाही सवाल पालकातून केला जात आहे