मी केज विधानसभा निवडणूक लढवणारच आहे - ठोंबरे

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भाजप पक्ष नेतृत्वाने आपणास थांबायला सांगितल्यामुळे मी गेली पाच वर्ष आहे तिथेच थांबले यावेळी पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागणार असून मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे मिळाली तर आनंदच राहील अन्यथा परिस्थितीनुसार त्या त्यावेळी पर्याय शोधू असे सूचक विधान करून मी केज विधानसभा निवडणूक लढवणारच आहे असा दावा केज विधानसभेच्या माजी आमदार प्राध्यापक संगीताताई ठोंबरे यांनी अंबाजोगाईत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष नेतृत्वाने आपणास थांबायला सांगितले होते पक्ष आदेश मानून आपण पाच वर्ष वाट पाहिली केज विधानसभा मतदारसंघात आपण आणलेल्या योजना आजपर्यंत राबवल्या गेल्या नवीन काय झाले असा प्रश्न उपस्थित करत बेरोजगारांना हाताला काम मिळावे यासाठी केज तालुक्यात सूतगिरणी आणली त्याचे काम प्रगतीपथावर आहे भविष्यात इतरही ठिकाणी अशाच पद्धतीचे उद्योगधंदे आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशीही ग्वाही माजी आमदार ठोंबरे यांनी बोलताना दिली
माजी आमदारांना पत्रकारांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला काळवटीची उंची वाढवणे, बुट्टेनाथ साठवन तलाव, अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न इतरही योजना पुढे सरकल्या नाहीत यावर माजी आमदार ठोंबरे यांनी आपण गेले पाच वर्षात प्रयत्न केला मात्र विद्यमान लोकप्रतिनिधींनी या कामात खोडा घातला त्यामुळे तर आपण यावेळी विधानसभा निवडणूक नुसती लढवण्यासाठी उभे राहणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार असल्याचे म्हटले उमेदवारी भाजपकडून मिळेल का ? असा प्रश्न केला यावर माजी आमदार ठोंबरे म्हणाल्या पक्षाकडे उमेदवारी मागणार आहे मात्र काही दगा फटका झाल्यास परिस्थितीनुसार योग्य त्यावेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही माजी आमदार ठोंबरे यांनी सांगितले