माजी आ. प्रा. संगीता ताई ठोंबरे पत्रकार परिषदेत उमेदवारीची घोषणा करणार ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
केज विधानसभा मतदारसंघातून आपणही इच्छुक उमेदवार असल्याचे सोशल मीडियावर विविध ग्रुप काढून अनेक जण मतदाराचा अंदाज घेत आहेत माजी आमदार प्राध्यापक संगीता ताई ठोंबरे यांनी उद्या अंबाजोगाई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती मिळत असून पत्रकार परिषदेत काय घोषणा करणार की उमेदवारीचा दावा करणार अशी चर्चा होत असून भाजप ,शरद पवार गट की आणखीन काय अशी उत्सुकता जनतेला लागली आहे
माजी आमदार प्राध्यापक संगीता ताई ठोंबरे यांनी पाच वर्ष केज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले यानंतर भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर गेल्या पाच वर्षात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमा पासून दोन हात त्या दूरच होत्या मात्र आता विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच माजी आमदार ठोंबरे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे त्या उद्या प्रथमच अंबाजोगाई येथे पत्रकारांशी संवाद साधणार असून पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करतील असे दिसते विशेष म्हणजे भाजपामधील नाराज गट माजी आमदार ठोंबरेच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणूक लढवायची तर पक्ष कोणता ? भाजप ,शरद पवार गट की आणखीन काय ? या सर्व प्रश्नांची उत्तरे उद्याच्या पत्रकार परिषदेत मिळतील असा अंदाज आहे बघू काय होते ते