बीडच्या महिलेचे पंधरा दिवसात झाले दोन वेळा सिजर

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात मराठवाडा किंवा इतर शासकीय रुग्णालयापेक्षा नक्की रुग्ण सेवा चांगली मिळते यात दुमत नाही मात्र काही घटना अशा घडून जातात की त्यामुळे चांगली रुग्ण सेवा देऊन सुद्धा अनेक वेळा प्रसूती विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडतो सध्या बीडहून आलेली महिलेचे दोन वेळा सिजर पंधरा दिवसात झाले नेमके काय कारण ? हे मात्र नातेवाईकांना आजही समजले नाही सध्या ती महिला जीवन मरणाशी झगडत असल्याचे समजते
सदरील महिला बीड येथील रहिवासी आहे जवळपास 16 ते 17 दिवसाच्या अगोदर ही महिला बीड वरून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात प्रसूती कक्षामध्ये उपचारासाठी दाखल झाली त्याची प्रसूती झाली मात्र सिजर झाले काही कालावधीनंतर पुन्हा त्या महिलेचे दुसरे सिजर झाल्याचे समजते 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान दोन वेळा सिजर झाल्यामुळे ती महिला शारीरिक दृष्ट्या अशक्त बनल्याचे समजते या महिलेच्या नातेवाईकांना दोन वेळा सिजर करण्याचे कारण काय ? असा प्रश्न आजही कायम आहे मग संबंधित डॉक्टर यांनी त्यांनी महिलांचे दोन वेळा सिजर करण्याचे कारण काय का सांगू शकत नाहीत यामुळे नातेवाईकांना संशय येऊ लागला आहे नातेवाईकांच्या माहिती नुसार या महिलेला व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे ती जीवन मरणाशी झगडत आहे जन्माला आलेले बाळ तेही अशक्त असल्यामुळे एनआयसीयु मध्ये त्यावर उपचार सुरू आहेत
कोणताही रुग्ण असो रुग्णाच्या प्रकृती संदर्भात नातेवाईकांना माहिती देण्याची जबाबदारी डॉक्टरांची नाही का? मग नातेवाईकांना अंधारात का ठेवले जाते बीडच्या महिलेचे दोन वेळा सिजर झाल्यानंतर त्याची प्रकृती अशक्त बनली दोन वेळा सिजर करण्याचे कारण काय ? याची माहिती नातेवाईकाना डॉक्टर का देत नाहीत असाही नातेवाईक सवाल करत आहेत सदरील प्रकरणी अधिष्ठाता यांनी सखोल चौकशी करून नातेवाईकांना पंधरा ते वीस दिवसांमध्ये दोन वेळा सिजर करण्याचे कारण काय या संदर्भात समाधानकारक माहिती देणे अपेक्षित आहे अधिष्ठता काय भूमिका घेतात हे पहावे लागेल मात्र या विभागात हे प्रकरण जरी उघडकीस आले असले तरी अनेक वेळा नातेवाईक मजबुरी म्हणून निमुट पणे सहन करतात मात्र उपरवाले के पास देर है लेकीन अंधेर नहीं असेच म्हणावे लागेल प्रत्येक नातेवाईक आपल्या रुग्णावर झालेल्या उपचार संदर्भात माहिती मागतो असे नाही पण जेव्हा अनाहुत घडते किंवा घडू लागते त्यावेळी नातेवाईकांच्या मनात संशय कल्लोळ निर्माण होणे साहजिक आहे अशावेळी डॉक्टरांनी रुग्णावर केलेले उपचार नातेवाईकांशी संवाद साधून समाधान करता येऊ शकते मात्र नेमके हेच का होत नाही त्यासाठी प्रसुती विभाग असो अथवा इतर कोणत्याही विभागातील रुग्णावर कमी वेळामध्ये दोन वेळा शस्त्रक्रिया करण्याची का वेळ येते यासंदर्भात संबंधित डॉक्टरने सक्षमपणे आपल्या कृतीचे समाधान करता यावे यासाठी सबळ पुरावा अत्यंत आवश्यक आहे