मुस्लिम समाज रस्त्यावर असताना निवडून दिलेले खासदार बजरंग सोनवणे आहेत कुठे ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
विशाल गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर येथे धार्मिक स्थळाची नासधूस तसेच निरापराध लोकांना अमानुष मारहाणीची घटना घडली या घटनेचा निषेध करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सकल मुस्लिम समाज आज रस्त्यावर उतरला असताना बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे कुठे आहेत ? असा सवाल जिल्ह्यातील मुस्लिम समाज करत आहे
अंबाजोगाई, केज , परळी ,माजलगाव, गेवराई ,बीड आष्टी ,पाटोदा सह सर्वच ठिकाणी तहसीलदार, उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदवला जाणार आहे आपल्या निवडीमध्ये मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा आहे असे नुसते तोंडी स्तुती सुमने उधळून कसे भागेल ? मुस्लिम समाजाचे प्रश्न सुटण्यासाठी प्रत्यक्षात खांद्याला खांदा लावून साथ द्यावी लागेल तरच प्रश्न सुटायला मदत होईल अशीही चर्चा होत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलीही अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेने मतदान केले आता त्या समाजाला आपण निवडून दिलेल्या खासदारांनी आपल्या मागणीसाठी रस्त्यावर यावे अशी मुस्लिम समाजातून मागणी होत आहे आता खासदार काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल