होय ! बीड लोकसभेचा निकाल कोणाच्या जिव्हारी लागला की नाही माहित नाही मात्र माझ्या जिव्हारी नक्की लागला आहे



.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
होय ! बीड लोकसभेचा निकाल कोणाच्या जिव्हारी लागला की नाही माहित नाही मात्र हा निकाल माझ्या नक्की जिव्हारी लागला आहे अशी लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा मनमोकळेपणाने कबुली देत आम्ही तुमच्या सेवेत रात्रंदिवस सतत असताना आमची जिरवण्यासाठी ज्याने कायम उसाच्या वजनात काटा मारून पाप केले कधी तुमच्या मदतीला आला नाही अशा व्यक्तीला तुम्ही निवडून देता आमचा दोष काय ? आमचा जन्म कुठे व्हावा यात चूक आमची आहे का ? तीन महिन्यानंतर पुन्हा निवडणुका येणार आहेत आपल्या कामी कोण आले भविष्यात कोण येईल याचा सादक बादक विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अंबा कारखाना परिसरातील आयोजित शेतकऱ्यांना संबोधित करताना केले यावेळी उपस्थित शेतकरी स्तब्ध झाले होते
अंबा कारखाना चालवायला किरायाने घेतला त्यात प्रचंड आर्थिक नुकसान झाले नफा तोट्याचा हिशोब आपण कधीच लावला नाही कायम आपण तोट्यातच असतो फक्त शेतकऱ्यांचा ऊस गाळप व्हावा एवढीच त्यामागे अपेक्षा होती एखादी निवडणूक हरलो म्हणून माझी इज्जत गेली असे समजायचे कारण नाही माझी इज्जत म्हणजे तुमची इज्जत गेली देशात कुठेही अशी निवडणूक झाली नसेल तशी निवडणूक बीड लोकसभेची झाली त्याला कारण काय जबाबदार कोण कारणे काय कोणी काम केले कोणी केले नाही कोण सोबत होते सोबत राहून सांगितले मात्र खाली ऐकले नाही हा भाग वेगळा येणाऱ्या काळात ही परिस्थिती बदलावी लागेल लीडर पब्लिकला लीड करत असतो मात्र पब्लिक जेव्हा लीड करते तेव्हा काय होते ते मागच्या लोकसभा निवडणुकीत कळले
माझा प्रामाणिकपणा या मातीशी आहे माझी इमानदारी या मातीतील माणसाशी आहे कोणत्याही जाती पाती धर्माशी नाही मत मागताना जातीपातीच्या नावाने मत मागण्याची वेळ आल्यास त्या दिवशी मी मताचे राजकारण करणार नाही त्यापेक्षा घरी बसून समाजकारण करीन पण कोणत्याही निवडणुकीला उभा राहणार नाही अशी भावना व्यक्त करत एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा फक्त साडेतीन हजार मताने आमचा पराभव झाला आम्ही तुमची कामे करण्यात कमी पडलो का समोरच्याने तुमची कोणती कामे केली त्यांनी तुम्हाला विचारले का विकास कामे सुखदुःख दैनंदिन अडचणीत तो आला होता का तरीसुद्धा त्याला मते का ? असाही सवाल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केला उमेदवार पंकजाताई उजव्या उमेदवार असताना अल्पमताने त्यांचा पराभव स्वीकारावा लागतो हा पराभव कोणाच्या जिव्हारी लागला की नाही माहित नाही माझ्या मात्र हा पराभव जिव्हारी लागला अशी खंत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली अंबा कारखाना किरायाने चालवायला घेतला त्यावेळी उसाची समस्या होती त्यावेळी आम्ही जात-पात धर्म पाहिला नाही माझ्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप झाला पाहिजे म्हणून आंबा कारखाना चालवताना 30 ते 35 कोटी रुपयांचा तोटा सहन केला रमेश आडसकर चेअरमन आहेत त्यांना चांगली माहिती आहे दुसरे उसाचे काटे मारून कमवायचे त्यातून अशा निवडणुका काढायच्या आमच्या वडिलांनी असले संस्कार आम्हाला कधी दिले नाहीत याचा अभिमान वाटतो असे धनंजय मुंडे म्हणाले
आडसकर - पाटील यांचे राजकीय वैर संपले ?
अंबा सहकारी साखर कारखान्याला पुन्हा पुनर्जीवित करण्यासाठी केंद्र सरकारकडून 80 कोटी रुपये कर्ज मंजूर झाले मिळून देण्यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत केल्याने अंबा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने धनंजय मुंडे यांचा कारखाना परिसरात सत्काराचे आयोजन केले होते त्यावेळी बोलताना व्हाईस चेअरमन दत्ता आबा पाटील पालकमंत्र्यांना उद्देशून म्हणाले तुमच्या साक्षीने साहेब शब्द देतो आडसकर पाटील यांची चालत आलेले राजकीय वैर शेतकऱ्यांच्या हितासाठी संपून आम्ही दोघेही हातात हात घालून अंबा कारखाना चालवून दाखवू असा विश्वास दिला यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले मी मदत केली हे उपकार नव्हे या भागातील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन त्यांच्यात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी ही मदत केल्याने मीही तुमच्या सोबत बरोबरीने उभा आहे यावेळी अंबा कारखान्याचे चेअरमन रमेश आडसकर व्हाईस चेअरमन दत्ता आबा पाटील ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण यांची समायोजित भाषणे झाली तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे यांनी आभार तर रवी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले