राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष औताडे यांचा दोन सर्कल मध्ये किती परिणाम ?

.
अंबाजोगाई( प्रतिनिधी)-
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पूर्वीचे तालुकाध्यक्ष कोण होते ? आहे का माहित ?कोणालाही माहीत नाही कारण राजकारणात कार्यकर्ते,नेत्याच्या कार्यामुळे ओळखते कार्य नसेल तर कोणीही आठवण ठेवत नाही आता नव्याने तालुकाध्यक्षपदी राजाभाऊ औताडे यांना नियुक्ती दिली आहे परळी विधानसभा मतदारसंघात औताडे यांचा राजकीय दृष्ट्या किती परिणाम होईल ते आगामी काळात कळेल मात्र बर्दापूर,राडी, पाटोदा सर्कलमधील प्रमुख कार्यकर्त्यांना मागे टाकत राजाभाऊ औताडे यांनी तालुकाध्यक्ष पटकावण्यात यशस्वी झाले
औताडे यांचा राजकीय प्रवास अनेक राजकीय नेत्याचे विश्वासू सहकारी म्हणून आजपर्यंत राहिला आहे ते कायम प्रमुख भूमिकेत होते मध्यंतरी राजकारणापासून त्यांनी दोन हात अंतर ठेवून व्यवसायावर लक्ष केंद्रित केले होते मात्र राजकीय पिंड असणारा माणूस राजकारणापासून लांब राहू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आगामी परळी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष पदाची नव्याने जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असली तरी दोन जिल्हा परिषद सर्कल मध्ये राजाभाऊ औताडे दोन महिन्यात राजकीय किती वातावरण निर्मिती करू शकतात की नाही यावर कोणीही ठामपणे दावा सांगू शकत नाही अगोदरच्या अध्यक्षांनी तालुक्यामध्ये काय वातावरण निर्मिती केली किती शाखा स्थापन केल्या? हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे नवनियुक्त तालुकाध्यक्ष यापेक्षा वेगळी करतील असे वाटत नाही नियुक्ती झाली अंबाजोगाई शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला दोन दिवस बॅनर लावले लोकांनी वाचले अभिनंदन केले यापेक्षा पुढे काहीच नाही राजकीय पक्षाचा पदाधिकारी याने जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावरची लढाई लढली तर त्याला लोक आठवण ठेवतात ओळखतात मात्र पाच दहा लाखाच्या गाडीमध्ये काचा लावून फक्त डिजिटलच्या माध्यमातून जनतेसमोर येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणीही आठवणीत ठेवत नाही हा इतिहास आहे त्यामुळे औताडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघात किती उपयोग होईल येत्या दोन-चार महिन्याच्या नंतर लक्षात येईल अशी चर्चा होत आहे