ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांचे सामाजिक कार्य माहीत नसल्याने धर्मादाय आयुक्त यांनी त्यांचा अर्ज केला बाद

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
योगेश्वरी देवल कमेटीवर ट्रस्टी म्हणून निवड करण्यासाठी बीडच्या सहायक धर्मादाय आयुक्त यांनी गेल्या काही दिवसापूर्वी अर्ज मागवले होते त्यानुसार इच्छुकांनी आपापले अर्ज सादर केले आयुक्त यांनी मुलाखती घेतल्या आलेल्या अर्जावर निकाल दिला 16 ट्रस्टीची निवड ही केली त्यात ज्यांचे अर्ज बाद केले त्यांच्यापुढे अर्ज बाद करण्याची कारणे दिली आहेत अंबाजोगाई शहरच नव्हे केज मतदार संघासह बीड जिल्हा ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या सामाजिक कार्यापासून अनभिज्ञ नाही त्यांना किमान 25 वर्षापासून सर्वसामान्य जनतेने सामाजिक काम करताना जवळून लांबून पाहिले मात्र बीडच्या धर्मादाय आयुक्तांना मुंदडा यांचा अर्ज बाद करताना त्यांचे सामाजिक कार्य नजरेस न आल्यामुळे त्यांनी त्यांचे सामाजिक कार्य नमूद नसल्याने अर्ज बाद केला असल्याचे म्हटले आहे मुंदडा समर्थकांना धर्मादाय आयुक्तचा हा निर्णय प्रचंड जिव्हारी लागला असून मुंदडा समर्थक काय भूमिका घेतात येणारा काळच ठरवेल मात्र ट्रस्टीच्या निवडीमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
दुसरा अत्यंत गंभीर मुद्दा असा दिसतो की आलेल्या अनेक अर्जदारांना तुम्ही अंबाजोगाई शहरातील रहिवासी नाहीत म्हणून तुमचा अर्ज बाद केला असे म्हटले आहे त्याबद्दल कोणाचाही आक्षेप नाही असणार नाही मात्र अनेक योगेश्वरी देवीच्या भक्तांचा तसेच देवल कमेटीचे गेली अनेक वर्ष ट्रस्टी म्हणून सेवा केलेल्या भक्तांचे ट्रस्टीचे म्हणणे आहे ज्यांना ट्रस्टी म्हणून निवड केली त्या धर्मादाय आयुक्त यांनी अर्ज मागवताना दिलेल्या प्रगटनावर दोन-तीन मुद्द्यावर फोकस केला होता तो म्हणजे अर्जदार अंबाजोगाई शहरातील असला पाहिजे दुसरा अर्जदार यांना कोणत्याही गुन्ह्यात शिक्षा अथवा त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असू नये अशी अट टाकली होती
नवनियुक्त ट्रस्टीच्या निवडीच्या विरुद्ध उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे अनेक जण याचिका दाखल करणार असल्याचे समजते काहींच्या दाखल केल्याची ही माहिती हाती येत आहे आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांनी ट्रस्टी पैकी अनेक जणांनी यापूर्वी इनामी तसेच देवस्थानच्या जमिनीचा खरेदीचा व्यवहार केल्याचे पुराव्यासह त्याच प्रकरणात गुन्हेही दाखल झाल्याचे पुरावे तसेच अनेकांचा मद्य विक्रीचा व्यवसाय असल्याचे पुरावे सोबत जोडले असल्याने या संदर्भात न्यायालयात काय आदेश होतो हे पाहावे लागेल निवड झालेल्या काही ट्रस्टी ग्रामीण भागातील नुसते रहिवाशी नाहीत तर त्या ग्रामपंचायत मध्ये पदाधिकारी यापूर्वी होते इतर मंदिराचे ट्रस्टी ही असल्याचे पुरावे तत्कालीन ट्रस्टीनी जमा करून याचिका दाखल केली असल्याचे समजते त्यांचा एकच धर्मादाय आयुक्तांना सवाल आहे की इतर अनेक अर्ज बाहेर गावचे रहिवासी आहेत म्हणून अर्ज बाद केले मग निवड केलेल्या काही ट्रस्टींचे गाव कोणते खात्री केली नव्हती का ? दुसरे विशेष असे की ट्रस्टीना गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे प्रमाणपत्र कोणी दिले अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचा अहवाल घेतला होता का ? ही कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता ग्रामीण तसेच बीड जिल्ह्याबाहेरील ट्रस्टीना अंबाजोगाई शहराचे रहिवासी असल्याचे कसे ठरवले या बेकायदेशीर निवडी विरुद्ध सर्वसामान्य भक्तामध्ये संतापाची लाट उसळली आहे धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन याचिका अशा सर्व स्तरावर या निवडीच्या विरुद्ध जनतेतून आगडोंब उठला असल्याने पुढे काय होते याकडे अंबाजोगाईकरांच्या नजरा लागल्या आहेत
नवनियुक्त ट्रस्टीना याची कल्पना असल्याने की काय कोण जाणे मात्र त्यांनी तातडीने सोमवारी बैठकीचे आयोजन केले असल्याचे समजते या बैठकीत सचिव ,उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष पदाच्या निवडी होतील मात्र सचिव पदावरून ट्रस्टी मध्ये दोन गट पडल्याची चर्चा आता बाहेर येत असून भोसले की लोमटे सचिव पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहावे लागेल या निवडीच्या विरुद्ध अंबाजोगाई शहरात सर्वपक्षीय आंदोलनाची सुरुवात झाल्याने याची कुनकुन बीडच्या धर्मादाय आयुक्त पर्यंत गेली की काय अचानक सहाय्यक धर्मादाय आयुक्त रजेवर गेले असल्याची माहिती मिळत आहे खरे काय खोटे काय त्यांनाच माहीत शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख बालासाहेब शेप यांनी पुढाकार घेत नवीन ट्रस्टीच्या निवडीच्या विरुद्ध आंदोलनाला सुरुवात केली त्यानंतर विश्रामगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली एक जुलै रोजी धरणे आंदोलन सोबत इतरही आंदोलने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुंदडा समर्थक ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा यांचा अर्ज ज्या कारणास्तव बीडच्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी रद्द केला हे ऐकून केज विधानसभा मतदारसंघातील मुंदडा समर्थक शांत बसतील असे वाटत नाही एवढे मात्र नक्की