देवल कमेटीवर निवड झालेल्या ट्रस्टीच्या निवडी रद्द साठी एक जुलै रोजी धरणे आंदोलन

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
योगेश्वरी देवल कमेटीच्या ट्रस्टीची निवड जाहीर होताच राजकीय क्षेत्रात भूकंप झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली होती सदरी बेकायदेशीर निवड रद्द व्हावी म्हणून येत्या एक जुलै रोजी अंबाजोगाई शहरातील सर्व पक्षीयांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निश्चय केला असल्याचे समजते तर निवड झालेल्या ट्रस्टीची सहा जुलै रोजी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीत सचिवाची निवड केली जाणार असल्याचे समजते
योगेश्वरी देवीच्या भक्तांना प्रश्न पडलाय की योगेश्वरी देवल कमेटीच्या ट्रस्टीच्या निवडी तर तीन वर्षाला होतात देवीचे अख्ख्या महाराष्ट्रात भक्त आहेत आज पावतो अनेक भक्तांनी देवीला देणग्या दिल्या मात्र आजपर्यंतच्या एकाही ट्रस्टीनी कधीही पारदर्शकपणे सर्वसामान्य भक्ताला तीन वर्षाचा हिशोब कधीच दिला नाही किंवा जाहीरही केला नाही त्यामुळे योगेश्वरी देवीच्या भक्तामध्ये आजही ट्रस्टींना एकच विनंती आहे की आता पावेतो ट्रस्टीकडे देणगी स्वरूपात किती आले कुठे खर्च झाला भक्तांना त्याचा तपशील जाहीर करावा एकही ट्रस्टी या संदर्भात मागणी सोडा तपशील ही सांगायला तयार नसतो असे का ?असा प्रश्न सर्वसामान्य भक्तांना पडत आहे
यावेळी ट्रस्टीच्या निवडी झाल्या त्या बेकायदेशीर आहेत त्यामुळे निवड रद्द करण्यात यावी म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक जुलै रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन होणार आहे शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख बालासाहेब शेप यांनी या सर्वात प्रथम पुढाकार घेतला होता योगेश्वरी देवल कमेटीवर निवड झालेल्या ट्रस्टीची येत्या 6 जुलै रोजी बैठक आयोजित केल्याची माहिती समोर येत आहे त्यात सचिवाची निवड केली जाणार आहे सचिव होण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे समजते कोणाला संधी मिळते पहावे लागेल मात्र संजय भोसले, पापा मोदी ,अशोक लोमटे या तीन संभाव्य नावाची चर्चा आहे या सर्व घडामोडीचा एका ट्रस्टीच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्याचे समजते तसेच पूर्वीचे काही ट्रस्टी वेगवेगळ्या कारणामुळे हैराण झाल्याची माहिती समोर येत आहे आता पाहू नवीन ट्रस्टीचा कार्यकाल कायम राहतो की आणखीन काही बदल होतो याकडे योगेश्वरी देवीच्या भक्ताचे लक्ष लागून आहे