केज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार प्रा संगीता ठोंबरे सह अनेक नेते सक्रिय झाल्याचे चित्र

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचा कल काय असेल तो असेल मात्र केज विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार प्रा संगीताताई ठोंबरे गेल्या काही महिन्यापासून सक्रिय झाल्याचे दिसत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे लोकसभा निवडणुकीपासूनच कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे इतरही अनेक इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क अभियानाला सुरुवात केल्याचे समजते राजकीय पक्ष कोणाला आपली उमेदवारी देतात त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल
पूर्वी राजकीय पक्षाचे आमदार खासदार निवडणूक लोकसभा असो की विधानसभा नगरपरिषद दरवेळी नेते पत्रकारांशी चर्चा करत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विशद करत असत मात्र अलीकडे ती प्रथा राजकीय नेत्यांनी पूर्णतः बंद केल्याचे दिसत आहे प्रत्येक नेत्याने आपल्या सोबत पत्रकारितेचे ज्ञान असलेला फुल टाइमर कार्यकर्ता गाडीत ठेवलाय दिवसभर झालेल्या दौऱ्याचे गाठीभेटीचे फोटो व्हिडिओ तो सोशल मीडियावर टाकतो तीच भूमिका पत्रकारांनी समजून घ्यायची असा ट्रेंड सध्या राजकीय नेत्यांचा झाला आहे
विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांनी केज विधानसभा मतदारसंघात दौरे सुरू केले मात्र एकाही इच्छुक उमेदवाराने पत्रकारांना बोलवून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली नाही एका पत्रकाराच्या मार्फत प्रेस नोट पाठवायची पाठवली की दुसऱ्या दिवशी एकच बातमी कॉपी-पेस्ट सर्व वर्तमानपत्रात जशास तशी बातमी छापून येत असल्याने राजकीय नेत्यांना पत्रकार परिषद घ्यावी वाटत नसावी मात्र प्रिंट असो की डिजिटल मीडिया तटस्थ पत्रकारिता कायम जिवंत राहणार एवढे मात्र नक्की
केज विधानसभा निवडणुकीपुरता विचार केला तर या मतदारसंघात जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे भाजपाचे नेते रमेशराव आडसकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष पापा मोदी हे त्रिकूट एकत्र आले तर राजकारणाचे चित्र वेगळेच पाहायला मिळू शकते अशी चर्चा होत आहे मात्र हे शक्य आहे का ? तर राजकारण शक्यतेचा खेळ आहे राजकीय समीकरणे कुठून कोणीकडेही जुळू शकतात बीड जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटात भविष्यात अनेक दिग्गज नेत्याचे प्रवेश होऊ शकतात अशीही शक्यता वर्तवली जात असल्याने अवघ्या काही दिवसात जिल्ह्यात मतदारसंघात बदलाचे संकेत मिळत आहेत बघू या काय होते ते !