योगेश्वरी देवल कमेटीवर माजी नगराध्यक्ष पापा मोदीचे वर्चस्व ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवल कमेटीच्या ट्रस्टी पदावर येण्यासाठी माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांना बरेच वर्ष संघर्ष करावा लागला होता मात्र तडजोडी अंती अखेर मोदी ट्रस्टी झाले होते पुन्हा एकदा योगेश्वरी देवल कमेटीच्या ट्रस्टीची निवड झाली असून यावेळी मात्र मोदींनी राजकारणातील एका दगडात अनेक पक्षांना घायाळ करत ट्रस्टमध्ये आपले वर्चस्व निर्माण करण्यात यश मिळवले मोदी है तो मुनकीन है अशी चर्चा अंबाजोगाई शहरांमध्ये सध्या सुरू आहे तर दुसरीकडे शहराबाहेरील असणाऱ्या ट्रस्टीमुळे या निवडी रद्द करण्यात याव्यात म्हणून आंदोलन सुरू झाले आहे पुढे काय होईल ते येणारा काळच ठरवेल
योगेश्वरी देवल कमेटीवर ट्रस्टी म्हणून अंबाजोगाई शहरातील अनेकांनी अनेक वर्ष सेवा केली सुधारणा काय झाली आजही भक्तांना शोध घ्यावा लागत आहे यापूर्वी ज्यांनी ज्यांनी मोदींना ट्रस्टी होण्यासाठी विरोध केला त्यांना यावेळी ट्रस्ट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याचे दिसते नवीन ट्रस्टी मध्ये सतीश भगवानराव लोमटे, प्रवीण दामा ,अजित चव्हाण, रवी कदम ,अमोल लोमटे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, संजय भोसले ,राजपाल भोसले, संध्या जाधव ,माजी नगराध्यक्ष पापा मोदी ,अशोक लोमटे, राजाभाऊ लोमटे ,शिरीष पांडे, हंसराज देशमुख ,आमदार नमिताताई मुंदडा, श्रीराम देशपांडे आदी 16 जणांची ट्रस्टी म्हणून निवड केली आहे तहसीलदार पदसिद्ध अध्यक्ष असतात
योगेश्वरी देवीचे पुजारी सध्या सारंग पुजारी आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते ट्रस्टमध्ये होते त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष अरुण पुजारीही ट्रस्टी म्हणून होते पुजारी मुंदडा समर्थक आहेत ते मोदी विरोधक मानले जातात गेले अनेक वर्षापासून पुजारी कुटुंब मंदिर परिसरातच वास्तव्यास राहते आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुजारी ट्रस्टी म्हणून नाहीत त्यामुळे ट्रस्टीनी जर वेगळा निर्णय घेतला तर सारंग पुजारी यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते त्यामुळे नवीन ट्रस्टीच्या निवडीच्या विरुद्ध ते आगामी काही काळात न्यायालयात जाऊ शकतात कारण ते सध्या शहराबाहेरील असणाऱ्या ट्रस्टीचे पुरावे जमा करण्यात व्यस्त असल्याचे समजते
दुसरे अत्यंत जुने राजकारणी माजी उपनगराध्यक्ष गिरधारीलाल भरडिया हेही राजकारणात तसेच योगेश्वरी देवल कमेटीच्या ट्रस्टमध्ये असताना त्यांची ही भूमिका पापा मोदी विरोधी राहिली आहे त्यामुळेच की काय कोण जाणे नवीन ट्रस्टीच्या यादीत गिरधारीलाल भराडिया यांना सुद्धा स्थान मिळू शकले नाही माजी आमदार पृथ्वीराज साठे योगेश्वरी देवीचे निस्सिम भक्त आहेत यापूर्वी अनेक वर्षापासून ते ट्रस्टी म्हणून होते आजी-माजी आमदारांचा ट्रस्टीमध्ये समावेश करण्यात आला आहे सध्या या निवडीच्या विरुद्ध शिवसेना उबाठा गटाने पुढाकार घेतला आहे आज काळ्या किती लावून मंदिराच्या समोर निदर्शने निषेध केला आंदोलनावेळी सामील होण्यासाठी आलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ऐनवेळी काढता पाय घेतल्याचे दिसत होते विशेष म्हणजे शिवसेनेच्या दादांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली असली तरी दिलीप दादा सांगळे हे आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शिवसेनेच्या दादाची अनुपस्थिती जानऊ दिली नाही त्यांची पडती बाजू सांभाळली अशीही चर्चा शिवसैनिका मध्ये होत होती