सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी 15 कोटी रुपयाच्या निधीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात


.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबा साखर कारखाना असो नाहीतर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन असो काल बाह्य झाले असताना सुद्धा दुरुस्ती होताच पुन्हा त्याच जोमाने चालायला लागली अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीनमध्ये नादुरुस्त पार्ट काढून यवतमाळच्या मशीन मधून आणलेला पार्ट बसवला ती मशीन सुरुवात करताच रुग्णांना ही सेवा मिळू लागली नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी प्रस्ताव बऱ्याच दिवसापासून आयुक्त कार्यालयात रेंगाळला होता नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याचे आयुक्त राजीव निवतकर यांनी त्याच खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला असल्याने अल्पावधीत 15 कोटी रुपयांची नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदी होऊन अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
बीड लोकसभेची निवडणूक संपली आता अवघ्या चार सहा महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्या दृष्टीने सर्वच मंत्री कामाला लागल्याचे समजते आज मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन बैठकीचे आयोजन केले असल्याचे समजते या बैठकीत अंबाजोगाईच्या रुग्णालय परिसरातील झालेली बांधकामे तसेच इतर रुग्णालयीन प्रश्नावर चर्चा झाली त्या बैठकीत अंबाजोगाईच्या रुग्णालयाचे कायापालट होईल असे अनेक धाडसी निर्णय घेतल्याची माहिती हाती येत आहे सर्वसामान्य रुग्णासाठी जीवदान देणारे सिटीस्कॅन मशीन गेली सहा सात महिन्यापासून बंद होती त्याच मशीनचा पार्ट इतर मशीन मधील पार्ट आणून बसवला तात्पुरती सेवा देण्यासाठी मशीन सुरू झाली आहे
नवीन 128 स्लाइस सिटी विथ कॉन्ट्रास्ट इनेन्सड ड्युअल एनर्जी मशीन विथ टर्न की अँड बाय बॅक ही यंत्र सामग्री खरेदीसाठी वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आयुक्तांनी प्रधान सचिवाकडे सिटी स्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यतेची परवानगी मागितली असल्याचे समजते यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे
दुसरी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयात वर्ग चारची पदे रिक्त असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे डीन ऑफिसने यापूर्वीच प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता त्यात म्हटले आहे की विद्यार्थी क्षमता 50 वरून 150 झाली मात्र कर्मचाऱ्यांची पदे मंजूर झाली नाहीत दररोज ओपीडी दोन ते अडीच हजार असते अंतर रुग्णाची संख्या 800 च्या वर आहे मंजूर खाटाची संख्या आठशे आहे एकूण मंजूर पदाची संख्या 254 असून 82 पदे नियमित भरली आहेत 172 पदे रिक्त आहेत जिल्हाधिकाऱ्यामार्फत पदस्थापना होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारी तत्त्वावर मजूर घेण्याची परवानगी द्यावी असा प्रस्ताव अंबाजोगाई रुग्णालयाचे डीन यांनी दिला आहे यावर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
तिसरा अत्यंत रुग्णाच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे नवीन 30 बेड न्यूरोसर्जरी विभाग नव्याने सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते अलीकडे अपघाताचे प्रचंड प्रमाण वाढले आहे हेड इंजुरी झालेल्या रुग्णावर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ यंत्रसामुग्री स्वतंत्र वार्ड स्वतंत्र शस्त्रक्रियागृह याची आवश्यकता असल्याने यासाठी लागणारी मंजुरी तसेच निधीच्या तरतुदीसाठीचा प्रस्ताव दाखल झाल्याने हे सर्व निर्णय येत्या काळात झाले तर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की निर्णय काय होतो याकडे अंबाजोगाईकरांचे लक्ष लागून आहे