केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कल भाजप विरोधी

सब टायटल: 
दोन दिग्गज नेते एकत्र असूनही अंबाजोगाई शहरात तुतारीला मतदान आघाडीवर
Rajkiya

.

        अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

केज विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार नमिताताई मुंदडा यांनी आपल्या कार्यकाळात करोडो रुपयांचा निधी आणून भरपूर विकास कामे केली सुरू आहेत भाजपाच्या पंकजाताई मुंडे यांना केज मतदार संघातून लीड मिळेल असे अपेक्षित असताना लीड मिळाली नाही मतदार संघातून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांना 14 हजाराची लीड असल्याने केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा कल भाजप विरोधी असल्याचे सिद्ध झाले आहे 

                   केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई ,केज , नेकनुर हे तीन प्रमुख मोठी शहरे येतात तीनही शहरात मुस्लिम व मराठा समाजाची मतदार संख्या जास्त आहे पंकजाताई मुंडे यांच्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई शहरात सभा झाली तरीही केज मतदार संघातील मतदारांनी भाजप विरोधी कौल दिल्याने भाजपाला आत्मचिंतनाची वेळ आली अशी ही चर्चा होत आहे तसे पाहता भाजपाच्या आमदारांनी निधी आणून तिन्ही शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न इमाने इतबारे करत असतानाही मतदाराचा भाजप विरोधी कौल जनतेचा आल्याने नेमके भाजपाचे कुठे चुकले या संदर्भात आत्मचिंतन केले जात असल्याचे समजते 

               अंबाजोगाई शहरात भाजपाचे मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोदी दोन्ही दिग्गज नेते गेले 25 वर्षापासून राजकारणात ठाण मांडून आहेत त्यामुळे पंकजाताई मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांना विश्वास होता दोन्हीही दिग्गज आपल्या सोबत असल्याने अंबाजोगाई शहरात आपल्याला लीड मिळेल विरोधी उमेदवार सोनवणे यांच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराज साठे ,अमर देशमुख ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख सोडले तर कोणीही प्रमुख नेता निवडणुकीत सक्रिय नव्हता तरीही जनतेने बजरंग सोनवणे च्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले अंबाजोगाई शहरातून बजरंग सोनवणे यांना सात ते आठ हजाराची मताची लीड मिळाली आहे 

           लोकसभा निवडणुकीचे वारे संपते ना संपते तोच सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारी लागल्याचे दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज शिवसेनेची बैठक बोलावली तर भाजपाने सुद्धा भाजप आमदाराच्या मतदार संघाचा आढावा घेणारी आज बैठक होणार आहे बदलत्या राजकीय गणितात अनेक काही वेळा पराभूत होऊन सुद्धा शरद पवारांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवणाऱ्या माजी आमदार पृथ्वीराज साठे राष्ट्रवादी पवार गटाचे प्रबळ दावेदार मानले जातात केज विधानसभा मतदारसंघातून लोकसभा उमेदवारासाठी त्यांनी लीडही मिळवून दिली आगे आगे देखते है होता हैं क्या !