शासकीय रुग्णालयातील डॉक्टर खाजगी रुग्णालयाचे मालक कधी झाले कळलेच नाही

सब टायटल: 
कंत्राटदार इमारतीच्या लाईफ संपल्यानंतर हस्तांतरण करणार आहेत का
Arogya Shikshan

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील बहुतांशी डॉक्टर शासकीय सेवेत असताना शहरातील खाजगी रुग्णालयाचे मालक कधी झाले अंबाजोगाई करांना कळलेच नाही व्यवसाय जरूर करा किमान ड्युटीच्या वेळेत रुग्णसेवा द्यावी एवढी माफक अंबाजोगाईकरांची अपेक्षा आहे ती द्याल ना डॉक्टर साहेब अशी विनवणी आज रुग्णांना करावी लागत आहे रुग्णालय परिसरात गेली दहा वर्षापासून अनेक इमारतीचे कामे सुरू आहेत जवळपास पूर्णही झाली असल्याचे समजते कंत्राटदारांनी या इमारती हस्तांतरण करण्याऐवजी त्याला दूध देणारी म्हैस समजून हस्तांतरण न करता डागडूजी सूरु असल्याचे समजते. लाईफ संपल्यानंतर त्या इमारती हस्तांतरण करणार आहेत की काय कोण जाणे

     अंबाजोगाईच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी योग्य ते उपचार केले नाही तर जनता राजकीय नेत्याकडे जाते तक्रार करते मग नेताजी डॉक्टरांना जाब विचारायचे मात्र आता ही पूर्ण प्रक्रिया बंद झाली आहे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाची सेवा करत अनेकांचे राजकीय भविष्य उज्वल बनले त्यामुळे रुग्णालयात सतत नेत्यांची नेतेगिरी बघायला मिळायची आपल्या शिफारसींना तात्काळ डॉक्टरांनी प्रतिसाद द्यावा म्हणून प्रमुख डॉक्टरांशी नेत्याची सलगी वाढली त्यामुळे अनेक डॉक्टर शिकले इथेच नोकरी लागली इथेच आता सेवानिवृत्ती इथेच अशी अवस्था अनेक डॉक्टर मंडळीची झाली आहे शासकीय सेवेत असणारे डॉक्टर तर आता स्वतःला राजकीय नेते समजून अंबाजोगाईकरांना अनेक जाहीर कार्यक्रमातून मार्गदर्शन करू लागले आहेत त्यामुळे राजकीय नेत्यांचे अप्रत्यक्षरित्या महत्त्व कमी होत असल्याचे पहावयास मिळत आहे 

          अंबाजोगाईचे शासकीय रुग्णालय अंबाजोगाईच नव्हे तर मराठवाड्यातील रुग्णांना जीवदान देणारे रुग्णालय म्हणून सर्वत्र परिचित होते रुग्णालयाला 50 वर्ष होत असताना आज रुग्णालयाची काय अवस्था आहे राजकीय नेत्यांना हे रुग्णालय डोकेदुखी वाटू लागल्याने एकही नेता रुग्णालयातील समस्येवर अपवाद काही नेत्याचा सोडला तर कोणालाही फारसा रस दिसत नसल्याचे दिसते रुग्णालय प्रशासनाची वेगळीच अडचण रुग्णालयात जे डॉक्टर आहेत त्यांनी आपले खाजगी रुग्णालय सुरू केल्याने त्यांची शासकीय रुग्णालय पेक्षा खाजगी रुग्णालयाकडे जास्त लक्ष असल्याचे दिसत आहे खाजगी रुग्णालय सुरू केली सुरू ठेवा मात्र शासकीय रुग्णालयाच्या वेळेत किमान रुग्ण सेवा द्यावी एवढी माफक अपेक्षा रुग्ण डॉक्टर कडून ठेवत आहेत त्यात गैर आहे असे वाटत नाही आज अंबाजोगाईच्या रुग्णालयातील हे बंद ते बंद कधी सुरू होईल माहित नाही वरून निधी देतील की नाही शाश्वती नाही मग अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील समस्येसाठी लढणारा कोणी राजकीय सामाजिक क्षेत्रात शिल्लक आहे की नाही असा प्रश्न जनतेला पडत आहे