आता बोंबला ! प्रसूती विभागातील सोनोग्राफी मशीन सहा महिन्यापासून बंद; गरोदर महिलांना खाजगीत जावे लागते

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
सिटीस्कॅन मशीन गेली सहा महिन्यापासून बंद आहे ती चालू करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने प्रयत्न करत असताना गेल्या वर्षीचा वार्षिक कराराची रक्कम डीन ऑफिस मधील संबंधित कारकूनाने प्रकरण प्रस्तावित केले नसल्याने कंपनीची ती 47 लाख रु ची रक्कम प्रलंबित आहे दुर्दैवाची बाब म्हणजे प्रस्तुती विभागात दररोज 100 पेक्षा जास्त महिला प्रसुती साठी येतात प्रसुती विभागात असणारी सोनोग्राफी मशीन गेली सहा महिन्यापासून बंद असल्याने दररोज येणाऱ्या गरोदर महिलांना सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्टर खाजगीत रुग्णांना पाठवितात विचार करा वेदनेसह आलेल्या महिला व नातेवाईकांना आर्थिक व मानसिक किती त्रास होत असेल ? रेडिओलॉजी विभागात मानवलोक संस्थेच्या सहकार्याने कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन दिली होती त्याचाही वार्षिक करार न केल्याने तीही मशीन बंद असल्याचे समजते अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मशीन तर आल्यापासून फक्त मशीन हाताळणारा स्टाफ नसल्याने ती मशीनच सुरू झाली नसल्याचे समजते एवढ्या महत्त्वाची आरोग्य सेवा देणाऱ्या मशीनचा कंपनीशी वार्षिक करार न करणाऱ्या प्रशासनातील नफदृष्ट्यांना शोधून ठेचावा अशी जनतेतून मागणी होत आहे
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयाला 2025 मध्ये पन्नास वर्षे पूर्ण होतील आशिया खंडातील या शासकीय रुग्णालयाची आज काय अवस्था झाली ती लपून राहिली नाही एक काळ होता राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून सर्व राजकीय सामाजिक नेते कार्यकर्ते एकत्र येऊन या रुग्णालयातील समस्येसाठी प्रशासनाशी लढा देत होते आता प्रत्येकाला वाटू लागले आहे विनाकारण त्यात एनर्जी वेस्ट करून आपला काय फायदा जेव्हा तुम्हाला रुग्णालयात आरोग्य सुविधेसाठी तडफडावे लागेल आरोग्य सुविधा मिळणार नाही त्यावेळी तुमचा इगो हार्ट होईल मग इतरांना हा प्रश्न किती महत्त्वाचा तुम्ही सांगाल असो आम्ही नेमके काय घडते तेच मांडतो कोणाला वाटले गोरगरीब रुग्णासाठी आपण यात पुढाकार घेतला पाहिजे तर घ्या अन्यथा कोणी ना कोणी पुढे येणारच आहे
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन असो सोनोग्राफी किंवा इतर मशनरी फिलिप्स कंपनीचे आहेत मशीनची दुरुस्ती करण्यासाठी डीन ऑफिस कंपनीशी वार्षिक करार करावा लागतो त्यासाठी कंपनीला रक्कम अदा करावी लागते डीन ऑफिसमध्ये ज्या मशीन आल्या त्याचा वार्षिक करार करण्यासाठी कर्मचारी नियुक्त असतात कर्मचाऱ्यांनी हे करण्यात हयगय केली असेल तरीही मशीन ज्या विभाग प्रमुखाच्या विभागाशी सलग्न आहे त्यांची जबाबदारी नाही का ? किंवा नव्हती का अधिष्ठाता डॉ धपाटे यांनी सुद्धा आता कडक भूमिका घ्यावी लागणार आहे प्रस्तुती विभागाकडील सोनोग्राफी मशीन सहा महिन्यापासून बंद आहे कागदी घोडे नाचवलेही असतील प्रस्तुतीच्या वेदना घेऊन आलेल्या महिलेला सोनोग्राफीसाठी खाजगीत जावे लागते त्यावेळी काय हाल होतात त्यातून गेल्याशिवाय इतरांना काय समजणार दुःख प्रस्तुती विभागाची सोनोग्राफी मशीन सहा महिन्यापासून बंद आहे विभाग प्रमुखाची काही जबाबदारी नाही का? रेडोलॉजी विभागातील कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन सुद्धा अशाच क्षुल्लक कारणामुळे गेले काही महिन्यापासून बंद असल्याची माहिती मिळत आहे दुर्दैवाची बाब म्हणजे अख्या शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियागृहात एकच व्हेंटिलेटर असल्याने डॉक्टरांना रुग्णाची शस्त्रक्रिया रद्द करावी लागली नाईलाजाने त्या रुग्णाला लातूरला खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली तब्बल चार लाख रुपये त्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना खर्च आला असल्याचे समजते
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात जसा उपलब्ध असणाऱ्या मशनरीचा प्रॉब्लेम आहे तसाच कार्यरत विभाग प्रमुख असणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचाही प्रॉब्लेम झालाय प्रत्येक जण राजकीय पुढार्याच्या नावाखाली आपल्याला डीन यांनी कोणतीही चौकशी, जाब विचारणा करू नये असे प्रत्येकाला वाटते त्यामुळे प्रभारी डीन असल्याने सीनियरटीचा मान ठेवून डीन विचारणाही करत नसावेत मात्र सर्वांनी हेच ठरवले तर 50 व्या वर्षात अंबाजोगाईचे शासकीय रुग्णालय पदार्पण करताना कोणत्या अवस्थेत असेल कल्पना न केलेली बरी असे म्हणण्याची वेळ अंबाजोगाईकरावर येऊ नये म्हणजे झाले !