कंपनीने नवीन अट घातल्याने सिटीस्कॅन मशीन सुरू होण्याची शक्यता कमी

सब टायटल: 
नवीन मशीन आल्यानंतरच रुग्णांना सिटीस्कॅनची सुविधा मिळण्याची दाट शक्यता
Arogya Shikshan

.

               अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेली सहा महिन्यापासून बंद आहे ती दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यासाठी यवतमाळच्या रुग्णालयातील बंद असणाऱ्या मशीन मधील लागणारा पार्ट देण्याची परवानगी मुंबईच्या वैद्यकिय शिक्षण खात्याच्या संचालक कार्यालयाचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर आता मशीन दुरुस्त करणाऱ्या फिलिप्स कंपनीच्या व्यवस्थापनाने सरड्यासारखा आपला रंग बदलत आमची गेल्या वर्षीची वार्षिक कराराची प्रलंबित देयकाची रक्कम मिळाल्याशिवाय पुढील कार्यवाही करणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अंबाजोगाई ची जुनी सिटीस्कॅन मशीन सुरू होण्याची शक्यता सध्या तरी कमी दिसत आहे 

         मुळात फिलिप्स कंपनीची ही जुनी मशीन आहे ती दुरुस्त केल्यानंतर एक पार्ट निकामी झाला तो पार्ट खरेदी करण्यासाठी 25 ते 30 लाख रुपयांचा निधी लागत होता कंपनीच्या इंजिनियरने रुग्णाची हेळसांड होऊ नये म्हणून इतर बंद मशीनचा पार्ट आणून अंबाजोगाईच्या रुग्णालयातील बंद असलेली मशीन सुरू करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रुग्णालयाचे दिन डॉ धपाटे डॉ जाधव यांनी मुंबईला जाऊन वैद्यकीय शिक्षण खात्याच्या संचालकाचे परवानगी पत्र यवतमाळच्या डीनच्या नावे आणले वाटले आता मेकॅनिक येऊन तात्काळ सिटीस्कॅन मशीन सुरू करेल संचालकाचे पत्र कंपनीला पाठवून तातडीने मेकॅनिक पाठवण्याची विनंती केली असता कंपनीने अचानक भूमिका बदलली गेल्या वर्षाची प्रलंबित वार्षिक करण्याची रक्कम दिल्याशिवाय आम्ही अंबाजोगाईला येऊ शकत नाहीत असे कळवले मुळात यापूर्वी डीन यांनी ही रक्कम प्रलंबित का ठेवली ? ही रक्कम कोठे खर्च केली का? कोणीही तपशिलात जात नाही अधिकारी व गुत्तेदार कंपनीच्या आर्थिक व्यवहारामुळे सर्वसामान्य जनतेला सिटीस्कॅन आरोग्य सेवा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे 

          शासन धोरणही चोराच्या उलट्या बोंबा असेच म्हणावे लागेल रुग्णालय परिसरात एक वेळ अशी येईल की कुठेही जागा शिल्लक राहणार नाही एवढ्या इमारतीचे सध्या बांधकाम होत आहे या बांधकामासाठी हजारो करोडो रुपयांचा निधी कोणीही मागणी केली नसताना शासन देते मात्र ज्यांच्याकडे सिटीस्कॅन साठी पैसे नाहीत असे हजारो रुग्णांना आजही सुविधा मिळत नाही त्या मशीनच्या दुरुस्तीसाठी अथवा नवीन खरेदीच्या प्रस्तावाला लाल फीतीचा कारभार नडतो आहे खाजगी मध्ये सिटीस्कॅन करण्यासाठी गोरगरीब रुग्णांना हजारो रुपये मोजावे लागतात मात्र इमारतीसाठी लागेल तेवढा निधी शासन देते ही लोकशाहीची शोकांतिकाच म्हणावी लागेल अशाही संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत त्यामुळे शासन जेव्हा नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदी करून देईल तेव्हाच अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांना सिटीस्कॅन मशीनची सुविधा उपलब्ध होण्याची दाट शक्यता दिसते एवढे मात्र नक्की