अंबाजोगाई नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग कंत्राटदाराला आंदन दिला आहे का ?

सब टायटल: 
कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे अंबाजोगाई शहरात कृत्रिम पाणीटंचाई
Rajkiya

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

        अंबाजोगाई नगर परिषदेत सत्ता असताना माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांच्या कौन्सिलने पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत विभाग, गार्डन एवढेच नाही तर निविदा विभागापर्यंत सर्व विभागाचे खाजगीकरण करून प्रत्येक कामासाठी कंत्राटदार नेमला त्यावेळी पासून पाणीपुरवठा विभाग गुत्तेदाराला सोपवले ते आज तागायत तोच गुत्तेदार कायम आहे त्यामुळे नगर परिषदेचा पाणीपुरवठा विभाग कंत्राटदाराला आंदण दिला आहे का ? असा सवाल केला जात आहे कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे अंबाजोगाई शहरात सध्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे 

        अंबाजोगाई नगरपरिषदेचे सीओ पदावर अधिकारी कोणीही येऊ पारदर्शक कारभार करण्याची मानसिकता कोणामध्येच नसते हेच आतापर्यंत सिद्ध झाले आहे मोदींची सत्ता होती म्हणून प्रत्येक सीओ मोदीचे ऐकत होते असे म्हटले जायचे मग सध्या बदली झालेले डॉ उत्कर्ष गुट्टे तर मोदीविरोधी होते विशेष म्हणजे बदली साठीही हातभार लावला अशी आजवर चर्चा होत आहे वर्षभराच्या काळात मोदींनी खाजगीकरणाच्या नावाखाली नेमलेले पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत विभाग आदी विभागातील कंत्राटदार गेल्या अनेक वर्षापासून तेच आहेत या सीओनी का बदलले गेले नाहीत असाही सवाल केला जात आहे 

                 आज आंबेजोगाई शहरातील जनतेला दहा ते बारा दिवसाला एकदा पाणी मिळत आहे एवढ्या उन्हाळ्यात पिण्याचे पाणी आले नाही तर लोकांना पाणी खरेदी करून प्यावे लागतय नगर परिषदेने नेमलेल्या कंत्राटदाराने नेमके पाणीपुरवठा यंत्रणेसाठी किती कामगार लावलेत लाईटच्या नावाखाली पाणीपुरवठा शहराला होत नाही बघायचे कोणी ? आता तर लोकसभेच्या मतदानानंतर सिओ यांची बदली झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून अंबाजोगाईचे तहसीलदार यांच्याकडे पदभार दिला आहे तालुक्याचा अगोदरच एवढा ताण असताना तहसीलदार नगरपरिषद प्रशासनाला हवा तेवढा वेळ देऊ शकत नाहीत सध्या तरी मगरूर कंत्राटदार जेव्हा पाणी सोडेल तेव्हा अंबाजोगाईकरांना पाणी प्यावे लागत आहे एवढे मात्र नक्की 

             अचानक मोदींना जाग कशी आली ?

       अंबाजोगाई नगर परिषदेची सत्ता हातून गेल्यानंतर जनतेला कोणतीच अडचण नाही समस्या नसल्यागत मोदी वागत होते शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सहा महिन्यापासून बंद आहे या संदर्भात दोन माजी आमदारासह पवार गटाच्या तसेच समाजवादी पक्षाच्यावतीने डीन यांना निवेदने दिली आमदार नमिताताई मुंदडा यांनी लेखी पत्र दिले माजी आमदार दौंड मोदी ज्या पक्षात आहेत त्याच अजित पवार गटात आहेत त्यांनी तर उपोषणाचा इशारा दिला ही समस्या हजारो गोरगरीब रुग्णासाठी होती तरी ही समस्या आहे असे पापा मोदीना आहे असे वाटले नसल्याने त्यांच्या गटाच्या वतीने यासंदर्भात डीनला साधे निवेदन सुद्धा त्यांना द्यावे वाटले नाही असो काल अचानक सोशल मीडियावर मोदींच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना शिष्टमंडळ भेटले तहसीलदार नव्हते त्यांच्या प्रतिनिधींनी निवेदन घेतले शहरातील पाणीटंचाई स्वच्छतेसह इतर प्रश्नाचा या निवेदनात समावेश असल्याचे समजते. नगरपरिषदेची सत्ता गेल्यानंतर लोकसभा निवडणूक झाली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याचे संकेत देताच अंबाजोगाई शहरातील समस्या काय आहेत त्या मोदी गटाला दिसू लागल्या चांगली बाब आहे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी का होईना जनतेच्या समस्येवर मोदी गटाने निवेदन दिले 

          अंबाजोगाई शहरातील पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट तसेच स्वच्छता ठेवण्यासाठी नियुक्त केलेले कंत्राटदार पापा मोदींच्या काळातील असल्याने अनेक वर्षापासून एकच कंत्राटदाराकडे नगरपरिषदेचे कंत्राट राहते कसे ? तेच कंत्राटदार जनतेची सोय करण्याऐवजी गैरसोय करत असतील तर त्यांना बदलून नवीन कंत्राटदार नेमण्याची मागणी करावयास हवी होती मात्र तशी मागणी करणे अपेक्षित नाही भविष्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना जनतेच्या प्रश्नावर निवेदन दिले हेही नसे थोडके