सिटीस्कॅन मशीन सुरू होण्यासाठीचे पत्र संचालक यांनी पारित केले

सब टायटल: 
पालकमंत्र्यांच्या धक्क्याने नवीन मशीन खरेदीची फाईल पुढे सरकली
Arogya Shikshan

.

        अंबाजोगाई (प्रतिनिधी)-  

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेली सहा महिन्यापासून बंद आहे ती सुरू होण्यासाठी लागणारे वैद्यकीय शिक्षण खात्याच्या संचालकाचे लेखी पत्र त्यांनी पारित केल्याने सिटीस्कॅन मशीनचा मेकॅनिक  आल्यानंतर लागणारा पार्ट प्राप्त होताच अंबाजोगाईची सिटीस्कॅन मशीन सुरू होईल असा आशावाद रुग्णालयाचे डीन डॉ धपाटे यांनी बोलताना व्यक्त केला आहे 

         अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन तात्काळ सुरू करा अन्यथा डीन ऑफिस समोर उपोषण करू असा इशारा माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी सुरुवातीला दिला होता त्यानंतर केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना दोन लेखी पत्र देऊन जुनी दुरुस्ती व नवीन मशीन खरेदीसाठी 15 कोटी रुपयांचा निधीला मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे अमर देशमुख यांच्या शिष्टमंडळाने डीन ची भेट घेऊन निवेदन दिले होते त्यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता तसेच समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड कांबळे यांच्या शिष्टमंडळानेही डीन यांच्याकडे या मागणीचे निवेदन देऊन लक्ष वेधले होते 

         अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद असून त्यामुळे गोरगरीब रुग्णांना प्रचंड प्रमाणात त्रास होत असल्याचे बाबीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे लक्ष वेधले असता मी मशीन दुरुस्त करून चालू करून देतो तसेच नवीन मशीन खरेदी दोन्ही विषयात लक्ष घालतो असा शब्द त्यांनी दिला होता दोनच दिवसात वैद्यकीय शिक्षण खात्यातील यंत्रणा तात्काळ हलली रुग्णालयाचे डीन डॉ धपाटे व डॉ राकेश जाधव यांनी सिटीस्कॅन मशीन संदर्भात आलेली निवेदने वरिष्ठ कार्यालयाला घेऊन मुंबईला गेले असता वैद्यकिय  शिक्षण खात्याचे संचालकाने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनचे नावे लेखी पत्र काढले असून अंबाजोगाईच्या सिटीस्कॅन मशीन सुरू होण्यासाठी लागणारे पार्ट हस्तांतरणासाठी परवानगी द्यावी असे पत्र दिल्याने जुनी सिटीस्कॅन मशीन सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचे समजते 

             सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाला एम आर आय मशीन खरेदीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तब्बल साडेआठरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता आता सिटीस्कॅन मशीन खरेदीसाठी सुद्धा तब्बल 15 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे त्यासाठी सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करणे गरजेचे आहे सिटीस्कॅनच्या फाईलने एक पाऊल पुढे टाकल्याची माहिती सध्या मिळत आहे