डोनेशन घेणाऱ्या शाळेवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी

सब टायटल: 
निवेदन देणारे भाजपमध्ये असताना मागणी मराठा महासंघाकडून का ?
Rajkiya

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

               अंबाजोगाई शहर व तालुक्यातील विविध शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पैशाची मागणी केली जाते फीस आकारल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही अशा शाळेवर कायदेशीर कार्यवाही शिक्षण विभागाने करावी अशी मागणी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण सह अनेकांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे 

            राणा चव्हाण व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केलेली मागणी रास्त व जनहिताची आहे मात्र राणा चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला मोदी गटातून मुंदडा गटात प्रवेश केल्यानंतर भाजपाला मराठा समाजाचा मोठा चेहरा मिळाला अशी चर्चाही त्यावेळी झाली त्यानंतर अनेक वेळा भाजपाच्या विविध कार्यक्रमात राणा चव्हाण यांची प्रमुख भूमिका ही दिसली हा प्रवेश झाल्यानंतर मोदी गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी मुंदडा गटात प्रवेश केला त्यामुळे मुंदडा गटाकडे अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश झाल्याने जुने चेहरे थोडे मागे पडले का ? असाही चर्चेचा सूर निघत आहे त्यामुळे की काय कोण जाणे राणा चव्हाण यांनी पुन्हा एकदा मराठा महासंघाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली असल्याचे दिसते 

        खरे पाहता विविध शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देताना डोनेशन फीस आकारली जाते ही समस्या आज उद्भवली असे नाही गेले अनेक वर्ष झाली प्रवेशाच्या वेळी या प्रश्नावर स्थानिक पातळीवर विविध पक्ष संघटनेचे नेते पदाधिकारी आवाज उठवतात हा प्रकार चालतो हे शिक्षण विभागाचे अधिकारी ,कर्मचारी, नेते, कार्यकर्त्यांना सर्वांना माहीत असते तरीही दरवर्षी तीच समस्या का ?असाही प्रश्न निर्माण होतो 

         विद्यार्थ्यांना डोनेशन फीस घेऊन प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोट्यात अनेकांच्या शिफारशीवरून प्रवेश दिला जातो अशीही चर्चा दबक्या आवाजात दरवेळी होते त्यामुळे ना शिक्षण विभाग ना तक्रारी करणारे कोणीच नंतर या मागणीचा पाठपुरावा करत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना डोनेशन घेऊन प्रवेश देण्याची प्रक्रिया आज पावतो कधीच बंद झाली नाही राणा चव्हाण सत्ताधारी भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी डोनेशन प्रक्रिया बंद करायची असेल तर प्रतिष्ठा केली तर त्यांच्यासाठी आमदार, खासदार शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना ही प्रक्रिया बंद पाडण्यासाठी भाग पाडू शकतात असे असताना राणा चव्हाण यांनी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून या मागणीचे निवेदन का दिले ? अशीही चर्चा होत राजकीय गोटात होत आहे