सिटीस्कॅन मशीनच्या मागणीसाठी राजकीय पक्ष, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपला निवडणूक झाली आता सर्वच राजकीय सामाजिक पक्ष संघटनेच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेली सहा महिन्यापासून बंद आहे ती सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडे केजच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी लेखी पत्र दिले आहे माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे अंबाजोगाई शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी गोरगरीब रुग्णासाठी एकत्र येऊन या मागणीसाठी लढा दिला तर शासन तातडीने यासंदर्भात पाऊले उचलेल निवडणुकीच्या वातावरणात कलुषित झालेली मने सिटीस्कॅन मशिनच्या चर्चेने मोकळे होतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल कोण घेईल पुढाकार ? यासाठी हे महत्त्वाचे आहे
अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन गेली दहा-बारा वर्षांपासून सुरू होती त्या मशीनची लाईफ संपली डीन ऑफिसने नवीन मशीनचा पुरवठा करण्याची मागणी केली त्याचबरोबर नवीन मशीन येईपर्यंत आहे ती मशीन ठेवून गोरगरीब रुग्णांना रुग्णसेवा देता येईल म्हणून दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवला निधी आला नाही मात्र यासाठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन मंडळातून 80 लाख रुपयांचा निधी अंबेजोगाईच्या रुग्णालयाला दिला त्याही निधीतून मशीन सुरू होत नाही डीन डॉ धपाटे म्हणतात आणखीन 25 ते 30 लाख रुपयांचा निधीची आवश्यकता आहे आज अंबाजोगाईच्या रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण आर्थिक परिस्थिती जेमतेम असणारा येतो दररोज या मशीनवर 50 ते 60 सिटीस्कॅन होत होते गेली सहा महिन्यापासून सदरील सिटीस्कॅन मशीन बंद आहे रुग्णांना केज अथवा परळीच्या रुग्णालयात सिटी स्कॅन करण्यासाठी जावे लागते या संदर्भात सर्वांनीच विचार करावा ही वेळ प्रत्येक गोरगरिबावर रुग्णावर येत आहे
अंबाजोगाई शहरामध्ये सत्ताधारी विरोधी गटाचे दिग्गज सामान्य सर्वच कार्यकर्ते नेते आहेत आता कोणतीही निवडणूक नाही त्यामुळे राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून सर्व राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सिटीस्कॅन मशीनच्या मागणीसाठी एकत्र येऊन शासनाला निवेदन देऊन एक दिवसाचे धरणे आंदोलन अथवा लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष गोरगरीब रुग्णाच्या हितासाठी वेधता येऊ शकते गरज आहे ती पुढाकार घेण्याची प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी पुढाकार घ्यावा अशी जनतेतून अपेक्षा आहे बघू या कोण पुढाकार घेतो ते !