अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन दुरुस्ती व नवीन खरेदीसाठी आमदार नमिताताई मुंदडा यांनी केली निधीची मागणी

Arogya Shikshan

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन सहा महिन्यापासून बंद आहे ती मशीन दुरुस्ती तसेच नवीन मशीन खरेदीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागातून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे 

                  आमदार मुंदडानी दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली त्या पत्रामध्ये म्हटले आहे की अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन ही फिलिप्स कंपनीने 30 डिसेंबर २०१२ साली पुरवठा केली होती त्याचा दहा वर्षाचा कालावधी 2022 मध्ये  पूर्ण झाला आहे ही मशीन पुन्हा उपयोगात आणण्यासाठी अपग्रेडेशन व पुढील तीन वर्षाकरिता वाढीव सीएमसी करण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च अपेक्षित आहे सध्या स्थित सिटीस्कॅन मशीन बंद आहे सदर सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यासाठी कंपनीचे इंजिनिअर यांनी पाहणी केली असता खर्चाचा अहवाल त्यांनी सादर केला त्यानुसार तब्बल दीड कोटी रुपये कंपनीचे डीन ऑफिस कडे प्रलंबित देयक आहेत यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी आमदार मुंदडानी लेखी पत्राद्वारे केली आहे 

             आमदार मुंदडा यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाला नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्यासाठी निधीची मागणी केली त्यात आमदार मुंदडानी म्हटले आहे की  पूर्वीच्या मशीनचा दहा वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे गोरगरीब रुग्णांना सिटीस्कॅनची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी दिन कार्यालयाने नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव पाठवला आहे त्यासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव विहित नमुन्यात अ ब क ड नुसार पाठवला आहे जुनी मशीन वर कामाच्या बोजा वाढल्याने सतत ती बंद पडत आहे सदरची मशीन महागडी असल्याने किंमत जास्त असते संस्थेच्या स्तरावर आवश्यक तेवढे अनुदान उपलब्ध नसल्याने हा निधी उभारणे कठीण होत आहे त्यामुळे सदर ठिकाणी नवीन सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदी करिता चालू वर्षाच्या अनुदानातून 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात यावा अशी ही मागणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आमदार नमिताताई मुंडे यांनी केली आहे