वाढदिवसाला सत्कार करणे म्हणजे अंबाजोगाई शहराचा विकास म्हणायचा का ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
सोशल मीडियावर काम करणारी यंत्रणा प्रत्येक राजकीय पुढाऱ्याकडे असल्याने फेसबुक वरील पोस्ट पाहून संबंधिताला फोन करून बोलावून घेऊन पुष्पगुच्छ द्यायचे व शुभेच्छा द्यायच्या याला अंबाजोगाईचा विकास म्हणायचा का ? असा अंबाजोगाईतील जनतेला प्रश्न पडू लागलाय कारण स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन सर्वसामान्य गोरगरीब रुग्णासाठी जीवदान देणारी आहे सहा महिने झाले त्याबद्दल लहान असो की मोठा एकाही राजकीय नेत्यांने रुग्णालयाचे डीन यांना साधे सिटीस्कॅन मशीन सुरू करा असे निवेदन दिले नाही त्यामुळे प्रश्न पडतो वाढदिवस साजरा करणे म्हणजे अंबाजोगाई शहराचा विकास समजायचा का ?
वाढदिवस साजरा करण्याला कोणाचाही आक्षेप नाही कोणी काय करावे ज्याच्या त्याच्या विवेकचा प्रश्न येतो मात्र जेव्हा आम्ही आमच्या उमेदवाराला अंबाजोगाई शहरातून लीड देणार आम्हीच अंबाजोगाई शहराचे विकास पुरुष आहोत असा दावा करता मग मात्र तुम्हाला जनता सवाल करणार नाव कोणाला ठेवावे की ठेवू नये हा प्रश्न नागरिकांना पडत आहे कोणालाही यातून सुटका देता येणार नाही त्यामुळे वाढदिवस जरूर साजरे करा मात्र जनतेच्या जीवन मरणाच्या प्रश्नावर केव्हा तरी विचार करणार आहात की नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे कोणाच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावण्याचे काही कारण नाही
मनाला वेदना देणारा मुख्य प्रश्न म्हणजे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद होऊन जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सिटीस्कॅन मशिनच्या दुरुस्तीसाठी 80 लाख रुपयांचा निधी दिला होता मशीन दुरुस्ती झाली लगेच एक पार्ट खराब झाला इतर रुग्णालयातील नादुरुस्त मशीनचा पार्ट मागून घेतला तर आंबाजोगाईची सिटीस्कॅन मशीन सुरू होऊ शकते संचालक कार्यालय भूमिका घ्यायला तयार नाही खेदाची बाब म्हणजे अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशिन सुरू करा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना बीडमधून केली जात आहे मात्र अंबाजोगाई शहरात स्थानिक पासून राष्ट्रीय पातळीवरील पक्ष, नेते ,कार्यकर्ते असूनही याकडे अंबाजोगाईतून डीन कडे दोन ओळीचे निवेदन कोणीही आजपावेतो दिले नाही सिटीस्कॅन मशीनची किती आवश्यकता आहे ज्याच्याकडे पैसे नाहीत डॉक्टर म्हणतात सिटीस्कॅन केल्याशिवाय उपचार करता येत नाही त्या रुग्णाला विचारा त्याच्यावर काय बेतत आहे म्हणून म्हणावेसे वाटते वाढदिवसाला सत्कार करणे म्हणजे अंबाजोगाई शहराचा विकास आहे का ?