माजी मंत्री क्षीरसागर व एम आयएमची तटस्थ राहण्याची भूमिका

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीने अनेकांना व्यासपीठ मिळाले तर काहींना आपली भूमिका ठरवण्यात अडसर निर्माण होत आहे त्यामुळे बीडचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व एमआय एम दोघांनीही लोकसभा निवडणुकीत आपली भूमिका तटस्थ राहण्याची घेतली असल्याचे समजते क्षीरसागराच्या वतीने दुजोरा दिला मात्र एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ गप्पच आहेत कारण काय तटस्थ राहिल्यामुळे फायदा कोणाला ? पंकजाताई मुंडे की बजरंग सोनवणे ? अशी चर्चा होत आहे
बीड जिल्ह्यातील राजकारणात कोणताही मतदारसंघ घ्या घराणेशाही खुलेआम असूनही कोणीही यावर ब्र शब्द बोलत नाही भाजप देशात घराणेशाही वर सतत प्रहार करत असते बीडमध्ये आमदारकी, मंत्रीपद क्षीरसागर कुटुंबाकडेच गेले अनेक वर्षापासून आहे पक्ष कोणताही असो निवडून कोण येतो त्याला तिकीट दिले जाते माजी मंत्री जयदत्त अण्णाची या निवडणुकीत अडचण झाली त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असली तरी त्यांना मानणारा समूह तटस्थ राहू शकत नाही अशी चर्चा होत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या पातळीवर निर्णय घेतल्याचे समजते जयदत्त अण्णांनी तटस्थ राहण्यापेक्षा समर्थकांची बैठक घेऊन निर्णय घ्यायला हवा होता अशीही चर्चा होत आहे
बीड जिल्ह्यात एमआयएम या पक्षाला मानणारा मोठा वर्ग मुस्लिम समाजात आहे कधी नव्हे तो यावेळी मुस्लिम समाजातून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले जात आहे गेले काही काळापासून पंतप्रधानाच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजात प्रचंड नाराजीचा सूर पाहावयास मिळत आहे त्यामुळे समाजातील प्रवाहाचा विचार करून बीड लोकसभेसाठी एमआयएम या पक्षाने उमेदवार दिला नसला तरी तटस्थ राहण्याच्या भूमिकेने पक्षातील पदाधिकाऱ्यामध्ये नाराजीचा सुर निघत आहे जिल्हाध्यक्षांनी बैठक बोलावून कार्यकर्ते यांची मते जाणून निर्णय घ्यायला हवी होती किमान समाजाच्या प्रवाह सोबत राहण्याचा निर्णय घ्यायला हवा होता अशीही चर्चा होत आहे क्षीरसागर व एम आय एम दोघांनीही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असल्याने फायदा कोणाला ? अशीही चर्चा जिल्ह्यात रंगत आहे