बीड लोकसभा निवडणुकीत घटक पक्षाच्या नेत्याची दैना

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अंतिम टप्प्यात आली महायुतीचे उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात थेट पंतप्रधान अंबाजोगाई शहरात आले घटक पक्षाचे प्रमुख नेते गर्दीमध्ये कुठे गेले दिसलेच नाहीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा येथे सत्कार करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर मात्र दिसले महाविकास आघाडीत सुद्धा फार वेगळे चित्र नाही येत्या नऊ मे रोजी शरद पवार यांची सभा अंबाजोगाईत आहे बघू या काय चित्र दिसते ते
पंकजाताई मुंडे यांनी मुस्लिम समाजाला आपल्या भाषणातून आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला मात्र पंतप्रधानाच्या वक्तव्याने मुस्लिम समाजामध्ये पुन्हा नाराजीचा सूर दिसत आहे पंकजाताई मुंडे मुस्लिम समाजाची कशी समजूत काढतात येणारा काळच ठरवेल कालच्या सभेची सर्व सूत्रे अक्षय मुंदडा यांच्याकडे होती त्यामुळे कोणाला कोणती जबाबदारी द्यायची हे त्यांनी निश्चित केले होते घटक पक्षाचे अनेक नेते उन्हाच्या लाहीत लाखत सभास्थानी बसल्याचे दिसले त्यांना फारशी कुठेही संधी मिळाली नसल्याचे समजते त्यामुळे गेली 25 वर्षापासून आपल्या नेतृत्वाचा अंबाजोगाई शहरावर दावा सांगणारे नेते आपला इलाज चालत नसल्यामुळे हात चोळत बसल्याचे चित्र दिसत होते पंकजाताई मुंडे व धनंजय मुंडे दोघे बहिण भाऊ एकत्र आल्याने धनंजय मुंडे यांचा सत्कार करावा लागला हेही तितकेच खरे अशीही चर्चा होत आहे पंतप्रधानांच्या सभेला अंबाजोगाई सह जिल्ह्यातील पत्रकारांना अगोदर तर पत्रकारांच्या गॅलरीमध्ये प्रवेश मिळाला नाही ज्या पत्रकारांना प्रवेश मिळाला त्यांना उभे राहून वार्तांकन करावे लागले पत्रकारांच्या खुर्च्या कार्यकर्त्यांनी बळकावल्या होत्या अशी ही माहिती समोर येत आहे यासंदर्भात कोणालाही ना खेद ना खंत अशी अवस्था माध्यमाची कधीही झाली नसल्याने पत्रकारावर सुद्धा आत्मचिंतनाची वेळ आली असल्याची चर्चा होत आहे
आता नऊ मे रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अंबाजोगाई शहरात येत आहेत आघाडीत घटक पक्ष शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्ष प्रमुख भूमिकेत आहेत आघाडीत काय होते नंतर कळेल एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवत आहे ती बाब म्हणजे महा युती असो की महाविकास आघाडी दोघांनीही माध्यमाच्या पत्रकारांना सुरक्षित अंतरावर ठेवल्याची चर्चा होत आहे पंतप्रधानाच्या सभेत पत्रकारांना आलेला अनुभव पवारांच्या सभेत कसा अनुभव येतो येणारा काळच ठरवेल