महाआघाडीच्या उमेदवाराने हात अकडता घेतल्याने प्रचार यंत्रणा अंबाजोगाई शहरात कोलमडली

.
अंबाजोगाई( प्रतिनिधी)-
निवडणुकीत उभा असलेला राजकीय पक्षाचा उमेदवार असो की आमदार ,खासदार ,मंत्री त्यांना सल्ला देणारी सल्लागार चुकीचे लाभले की हाता तोंडाला आलेला घास दूर जाऊ शकतो अशी म्हण आहे मात्र ही तंतोतंत बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवाराला लागू पडत असल्याची चर्चा होत आहे आपण निवडून आलो या अविर्भावामुळे उमेदवाराने रसद पुरवण्यासाठी हात आखडून घेतल्याने प्रमुख प्रचारका सह महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यातूनही नाराजीचा सूर निघत असल्याची चर्चा होत आहे
महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली या गटाचे प्रमुख माजी आमदार पृथ्वीराज साठे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख सह इतर कार्यकर्ते सध्या कार्यरत आहेत घटक पक्षाचे नेते आपापल्या परीने कसोशीने प्रचार करत आहेत विरोधी गटाचा धुमधडाक्यात प्रचार सुरू असताना महाविकास आघाडीचे प्रचारक सकाळ-संध्याकाळ नागरिकांना मतदारांना नमस्कार करत फिरत आहेत मात्र उमेदवाराकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने प्रचारकात सुद्धा मरगळ आल्याची चर्चा होत आहे
उमेदवाराने निवडणूक अगोदर प्रचंड वल्गना केल्या समर्थकांनी दावे प्रति दावे केले मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी अंतिम टप्प्यात येऊन सुद्धा प्रचार यंत्रणेचा विषय काढला की मी आष्टी ,पाटोदा ,बीड, गेवराईकडे असल्याचे प्रमुख कार्यकर्त्यांना निरोप मिळत आहेत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे मतदार तसेच प्रचारक मधील उत्साहवर्धक वातावरणामुळे उमेदवार जर यंत्रणेसाठी हात आकडत असतील तर वातावरण बदल व्हायला उशीर लागणार नाही अशाही संतप्त प्रतिक्रिया प्रचारकातून ऐकवयास मिळत आहेत
महाविकास आघाडीच्या वतीने सर्वात प्रथम शिवसेना उबाठा गटाच्या वतीने अंबाजोगाई शहरात महासभेचे आयोजन करण्यात आले राष्ट्रवादी पवार गट व काँग्रेस पक्षाकडे नेते कार्यकर्त्याचा अभाव असल्याने शिवसेना उबाठा गटाने या सभेचे आयोजन केले होते सभेत भाषणासाठी नेत्यांची चढाओढ लागल्याचे दिसले उमेदवाराने भूमिकेत बदल केला नाही तर वातावरणात बदल व्हायला वेळ लागणार नाही असाही निर्वाणीचा इशारा कार्यकर्त्याच्या मार्फत दिला जातोय बघू या काय होते ते !