अंबाजोगाई जिल्हा नाही, एमआयडीसी आली नाही, बुट्टेनाथ साठवण तलाव झाला नाही मिळाले काय ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू आहे निवडणुकीत उभा असलेल्या उमेदवाराने पूर्वी काय केले यापेक्षा जनतेने निवडून दिले तर भविष्यात काय करणार हे कोणी विचारायला तयार नाही विकासाऐवजी निवडणूक जातीपाती वर आली अंबाजोगाईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अंबाजोगाई जिल्हा आज पावतो का झाला नाही ? जिल्ह्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी झाली अंबाजोगाईला का झाली नाही ?पिण्याच्या पाण्यासाठी आज पावतो करोडो रुपयांच्या योजना नगर परिषदेमार्फत राबवल्या गेल्या मात्र कायमस्वरूपी प्रश्न मिटू शकतो असा बुट्टेनाथ साठवण तलाव का झाला नाही काळवटी साठवण तलावाच्या भिंतीची उंची का वाढली नाही साध पिंपळा धायगुडा येथे एफएम सेंटरचे उद्घाटन झाले पुढे काय झाले आज पावतो कळले नाही असे अनेक प्रश्न आहेत ते लोकसभेच्या निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवाराने जनतेला आश्वासन द्यायला हवे अथवा जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घ्यायला हवे मात्र जनतेतूनही या संदर्भात कोणी प्रश्न विचारणार आहे की नाही हा खरा मूळ प्रश्न आहे
राजकारणात काहीही होऊ शकते ही म्हण आता जुनी झाली असून आता काही बी होऊ शकते म्हणण्याची पाळी आली आहे अंबाजोगाई शहरात पुढार्यांनी नवीनच फंडा सुरू केलाय असे दिसते फेसबुकवरील पोस्ट पाहून त्या व्यक्तीला बोलाऊन घ्यायचे आणि पन्नास साठ रुपये खर्च करून त्याचा सत्कार करून तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल करायचा हे काम नेतृत्वाचे असते काय तुम्ही ज्याचा प्रचार करता त्याच्यापासून अंबाजोगाई शहराला गावाला काय मिळाले किंवा मिळणार आहे हे महत्त्वाचे असते त्याकडे राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष दिसते अशी ही चर्चा होत आहे
अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न किती वर्षापासून रेगळत पडला आहे आज पर्यंत जिल्हा का झाला नाही त्याला तर दोन्हीही सत्ताधारी विरोधक जबाबदार आहे अशीच जनतेची धारणा आहे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते मंत्रिमंडळाचा पहिला ठराव अंबाजोगाई जिल्ह्याचा होईल आज पावतो का झाला नाही पवार साहेब सांगतील का? अंबाजोगाई जिल्ह्याच्या मागणीला उमेदवार पंकजाताई मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा विरोध की समर्थन हे जाहीर करतील का ?जनता यावर दोन्ही उमेदवाराला विचारायला तयार नाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी झाल्या अंबाजोगाईला मराठवाड्याचे पुणे म्हणायचे मात्र आज पावेतो अंबाजोगाईला एमआयडीसी का झाली नाही यालाच विकास म्हणायचा का असाही जनतेतून सवाल केला जात आहे
अंबाजोगाई जिल्हा निर्मिती सारखा बुट्टेनाथ साठवण तलावाच्या संदर्भात प्रश्न अडगळीत पडला आहे शासनाची मंजुरी असताना आज पावतो बुट्टेनाथ साठवण तलाव का झाला नाही अंबाजोगाईकरांनी महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे असो की महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना नागरिकांनी या मागणी संदर्भात जाब विचारायला पाहिजे लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख आली तरी चर्चा विकासाऐवजी जातीपातीवरच अडकून पडली आहे उमेदवार ही मूळ मुद्द्यावर यायला तयार नाहीत कोणतेही आश्वासनाशिवाय ही लोकसभेची निवडणूक होत आहे असेच म्हणावे लागेल विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली नाही तर निवडणूक झाली काय ,नाही झाली काय उपयोग काय अशीही चर्चा जनतेतून होत आहे