बीड लोकसभा मतदारसंघात एवढे मुस्लिम उमेदवार आले कसे ?

सब टायटल: 
उमेदवाराचे सीडीआर तपासले तर सत्य उघडकीस येण्याची शक्यता
Rajkiya

.

           अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

   बीड लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या पंकजाताई मुंडे महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता दिसते सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एकूण उमेदवारात 15 ते 16 उमेदवार मुस्लिम समाजाचे आहेत एवढे मुस्लिम उमेदवार आले कसे ? असा प्रत्येकाला प्रश्न पडला आहे तसाच प्रश्न मुस्लिम समाजातील तरुणांनाही पडला असल्याने चर्चेचा विषय बनला आहे 

     बीड लोकसभेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याऐवजी भावनिक मुद्द्यावर होत आहे सर्वच राजकीय पक्ष याच मुद्यावर निवडणूक लढवीत इच्छितात  त्यामुळे महागाई, बेरोजगारी ,उद्योग, शेती तसेच शेतीमालाच्या किमतीत घसरण बेसिक मुद्द्यावर कोणीही बोलू इच्छित नाही मतदारातून उमेदवारांना कोणीही प्रश्न विचारत नाही लोकसभेची निवडणूक धोरणात्मक मुद्द्यावर व्हायला हवी होती मात्र मतदार ना उमेदवार दोघेही मूळ मुद्द्यापासून कोसो दूर असल्याचे सध्यातरी चित्र दिसत आहे 

       महायुतीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे दोन्हीही पक्षाचे नेते आपापल्या समर्थकांना सोबत घेऊन दररोज सकाळ संध्याकाळ स्वतंत्र अंबाजोगाई शहरात प्रचार, पदयात्रा काढत आहेत दोन्ही गट फक्त फेसबुक व्हाट्सअप वर फोटो टाकून प्रचार केल्याचे दाखवत आहेत यालाच म्हणतात का प्रचार ?असेच म्हणण्याची पाळी मतदारावर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अंबाजोगाई की बीड ला कोठे होणार माहित नाही मात्र निवडणुकीत प्रचार भावनेवरच होणार का ?असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे 

            सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड जिल्ह्यातून अनेक मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उमेदवार म्हणून उभे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार येण्याचे कारण काय ?यावर मुस्लिम समाजात मंथन सुरू असून उमेदवारीसाठी लागणारी रसद कोणी पुरवली? यावरही बरेच मंथन सुरू असून मुस्लिम तरुण उमेदवारांना जाब विचारणार असल्याचे समजते विशेष म्हणजे या उमेदवाराचे सीडीआर रेकॉर्डचीही तपासणी करून उमेदवाराच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आहेत यावरही नजर टाकली जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे बघू या पुढे काय होते ते !