माजलगाव तालुक्यात पंकजा ताई मुंडे यांना अडवले

.
माजलगाव (प्रतिनिधी)
तालुक्यातील लवुळ क्र.१ येथे बीड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना येथील मराठा सकल युवकांनी सोमवार रोजी प्रचारासाठी गावात येताच त्यांची गाडी आडवण्यात आली. यावेळी या युवकांनी लेखी आश्वासन देण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत पंकजा मुंडे यांना सभास्थळी नेण्यात आले.
लवुळ येथे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच मराठा सकल युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे चा ताफा या चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवुन त्यांना घेराव घातला. यावेळी पंकजा मुंडे खाली उतरून सर्व युवकांना मराठा आरक्षणाबाबत आपला असलेला पाठिंबा याबाबत समजून सांगत होत्या. परंतु यावेळी सर्व युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व तुम्ही बॉण्डवर मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे असे लिहून द्या असा आग्रह केला
हा सर्व प्रकार गावात जाताना अर्धा तास व त्या परत जाताना पंधरा मिनिटे त्यांना अडवण्यात आले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना या युवकांपासून बाहेर काढण्यात यश आले