आमदार मुंदडांचा शहरात डोअर टू डोअर मित्र पक्षासोबत प्रचाराचा झंजावात

सब टायटल: 
राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रचारासाठी मूहुर्त सापडेना का ?
Rajkiya

.

          अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

   केज विधानसभेच्या विद्यमान आमदार मुंदडा यांनी सोबत येतील त्या मित्र पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन अंबाजोगाई शहरात डोअर टू डोअर प्रचाराच्या पदयात्रा सुरू केल्याचे दिसत आहे मात्र आमदाराच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कुठेच प्रचारात दिसत नाही या गटाला प्रचारासाठी मूहुर्त सापडत नाही का ? अशीही राजकीय क्षेत्रात चर्चा सुरू आहे 

              अंबाजोगाई शहराचा विचार केला तर राजकारणात मोदी मुंदडानी तिसरा पर्याय राजकारणात निर्माण होऊ दिला नाही अथवा झाला नाही विधानसभेला मुंदडाना नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोदींना अशी सोयीची भूमिका राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते घेत असल्याने गेली 25 वर्षात संघर्षाचा कधी मोदी मुंदडाना आमने-सामने योग आला नाही त्यामुळे शहरातील अल्पसंख्याक समाजाचे आपणच मसिहा आहोत सतत भाजप पक्ष कसा वाईट आहे याची भीती दाखवत नगर परिषदेत आपल्या नेतृत्वाखाली सत्ता आणायची मग सत्ता आली की भाजपसोबत पाच वर्ष युती करायची त्यामुळे आजपर्यंत हे चालत आले 

              मुंदडानी विधानसभा निवडणुकीत भाजपामध्ये प्रवेश केला त्या निवडूनही आल्या त्यामुळे त्यांची भाजप म्हणून जनतेत स्पष्ट भूमिका आहे त्यांनी कधी आत एक बाहेर एक असे राजकारण केले नाही काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित दादा पवार यांनी सत्तेत सहभाग घेतला उपमुख्यमंत्री झाले धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष पापा मोदी यांनी अजित पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला 

           योगायोगाने लोकसभेची निवडणूक लागली जिल्ह्यात भाजप ,शिवसेना शिंदे गट , राष्ट्रवादी अजित पवार गट जोमात कामाला लागला भाजपाच्या आमदारांनी मतदार संघासह अंबाजोगाई शहर प्रचाराने पिंजून काढले आमदारांच्या दौऱ्यात सर्व मित्र पक्षाचे नेते कार्यकर्ते दिसले मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचा अपवादाने एकही कार्यकर्ता नेता प्रचार दौऱ्यात दिसला नाही अंबाजोगाई शहरात या गटाची भूमिका काय असाही सवाल केला जात आहे उद्या उमेदवार पंकजाताई मुंडे आपली उमेदवारी अर्ज भरणार आहेत यावेळी अंबाजोगाईच्या अजित पवार गटाचे नेते कार्यकर्ते हजर राहतात की अनुपस्थित राहतात यावर या गटाची भूमिका भविष्यात काय असेल समजेल अशी चर्चा होत आहे आमदारांनी प्रचारात आघाडी घेतली एवढे मात्र नक्की !