शासकीय रुग्णालयाच्या ओपीडी मध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीच्या घटनेत 16 जणाविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल

Crime

.

            अंबाजोगाई (प्रतिनिधी )- 

       शहरातील पाटील चौकात गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीचे पर्यावसन स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली त्यानंतर फेरोज अब्दुल सत्तार कुरेशी रा. अंबाजोगाई यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या 16 जणांच्या विरुद्ध कलम 307 326 ,326 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

            फिर्यादी फिरोज कुरेशी यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की काल दिनांक 21 एप्रिल रोजी पाटील चौक येथे रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास माझा पुतण्या अर्शान कुरेशी यांनी मला फोन करून सांगितले की पाटील चौकात गाडी पार्किंगच्या कारणावरून माझे व साकेब पठाण व इतर पाच सहा जणांशी भांडण झाले त्यांनी मला लोखंडाचे एक किलोचे माप गमजामध्ये गुंडाळून मारहाण केली तात्काळ मी त्या ठिकाणी गेलो जखमी अवस्थेत त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो व त्याच्यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात गेलो होतो ऑटोतून उतरत असताना आम्हाला साकेब जहीर पठाण, जहांगीर मीर पठाण ,दौलत मिर पठाण, साहिल पठाण, सोहेलनाज खान, कलीम नियमत पठाण, साकेब पठाण, आफताब शेख, मुशरफ माजिद शेख, पठाण फरदीन मिरखान ,नाज पठाण, फिरोज पठाण ,इफाजत मीर खान पठाण, नदीम जलील शेख, शाहरुख मिरखान पठाण, अखतर खान पठाण सर्व राहणार सदर बाजार अंबाजोगाई यांनी हातामध्ये रॉड , काठया ,दगडाने मारहाण करून जबर दुखापती केल्या त्यामध्ये फेरोज कुरेशी फिर्यादीच्या डोक्यात साकेब पठाण यांनी त्यांच्या हातातील लोखंडी रॉड जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून जखमी केले असेही फिर्यादीत म्हटले आहे 

           फिर्यादी फिरोज कुरेशी यांच्या फिर्यादीनुसार 16 जणांच्या विरुद्ध कलम 307, 326 ,324 ,323, 504, 506, 135, 143 ,147, 148 ,149 आदी कलमान्वय शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्हीही गटात शासकीय रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये राडा झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये एवढी सुरक्षा यंत्रणा असताना झालेला राडा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे या राड्यात उपचारासाठी आलेला रुग्ण जखमी झाला असता अथवा ही घटना घडत असताना ओपीडीमध्ये उपचार करणारे आरोग्य सेवक आपला जीव मुठीत धरून उभे होते अशा घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस कृती आखली जावी अशी ही मागणी जनतेतून होत आहे बघू या रुग्णालय प्रशासन काय भूमिका घेतात ते