सिमेंटचे पूल अंगावर पडल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू

सब टायटल: 
दोघेजण गंभीर जखमी अंबाजोगाईच्या रुग्णालयात
Crime

.

           अंबाजोगाई प्रतिनिधी 

धर्मापुरी वरून भोजनकवाडी कडे ट्रॅक्टर मधून सिमेंटचे खांब घेऊन जात असताना ट्रॅक्टरचा अचानक अपघात झाला सिमेंटचे फुल मजुरांच्या अंगावर पडल्याने सिमेंट पोलच्या खाली दबून दोघामजूरांचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले जखमी मजुरांना आंबेजोगाई च्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत 

सिमेंटचे पोल घेऊन जाणारा ट्रॅक्टर कॉलेज जवळील उतारावर अचानक पलटी झाला पोलमजुरांच्या अंगावर पडले पोल खाली प्रल्हाद वैजनाथ फड व माणिक केदार दोघेही राहणार भोजनकवाडी सिमेंटच्या पोलच्या खाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारच्या रात्री घडली घटनेनंतर ट्रॅक्टर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे समजते दोघा मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याने भोजनकवाडी गावावर शोक कळा पसरली आहे आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात गंभीर जखमी असलेले प्रवीण उत्तम तिडके व रावण माणिक केदार रा भोजनकवाडी यांच्यावर उपचार सुरू आहेत सदरील अपघाताची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मदत केली व जखमीना रुग्णालयात पोहोच केले