बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सर्व रस्ते आजही अपूर्णच का ?

सब टायटल: 
खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी गेली पाच वर्षात एकदाही या कामाचा आढावा का घेतला नाही
Rajkiya

.

             अंबाजोगाई (प्रतिनिधी )-

      बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग खात्या अंतर्गत बीड जिल्ह्यात करोडो रुपयाचा रस्ते विकास निधी आणला रस्त्याची कामेही सुरू झाली पिंपळा ते परळी रस्त्याच्या दुर्दशेचा फटका पंकजाताई मुंडे यांना विधानसभा निवडणुकीत बसला त्यांना पराभव पत्करावा लागला ही बाब अलाहिदा त्यानंतर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे निवडून आल्या आजही राष्ट्रीय महामार्गाचा कोणताच रस्ता पूर्ण झाला नाही मात्र गेली पाच वर्षात बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांनी हे रस्ते अपूर्ण का आहेत ? याचा जाब राष्ट्रीय महामार्ग अथवा गुत्तेदारांना एकदाही का विचारला नाही ? असा सवाल आता नागरिक करत आहेत

         भाजपाने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजाताई मुंडे यांना विद्यमान खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांना डावलून उमेदवारी दिली एक तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पंकजाताई मुंडे यांच्या नावाची चर्चा व्हायची मात्र उमेदवारी भाजपाने आज पावेतो दिली नव्हती. दिली ती त्यांच्या घरातील एकाला डावलून दुसऱ्याला उमेदवारी दिली पक्षातील नेत्यांना वाटले पंकजाताई मुंडे यांच्या घरातच बंड होईल मात्र तसे काही झाले नाही महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगेना उमेदवारी दिली आहे 

            मराठा विरुद्ध ओबीसी वाद बरेच दिवस बीड जिल्ह्यात चालला लोकसभेची निवडणूक लागली योगायोगाने बीडमध्ये प्रमुख दोन उमेदवारात निवडणूक रंगतदार बनत आहे ते दोन्हीही उमेदवार मराठा विरुद्ध ओबीसी असेच आहेत दोन्हीही बाजूने सोशल मीडियावर समर्थक एकमेकांना ट्रोल करत आहेत ही बाब दोन्हीही उमेदवारांनी विचार करून आपल्या समर्थकांना सोशल मीडियावर वातावरण कलूशीत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे अशी ही जनतेतून मागणी होत आहे लोकसभेची निवडणूक आहे निवडणुकीच्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होत नाही होते ती फक्त जातीवर ज्याचा निवडणुकीशी काडीचाही संबंध नाही 

            पाच वर्षात आढावा का घेतला नाही 

         बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे पाच वर्ष जिल्ह्याच्या खासदार होत्या फंड का वाटला नाही जिल्ह्यात एखादा प्रकल्प का आला नाही याची चर्चा आज करून उपयोग नाही कारण त्या चर्चेची वेळ गेली मात्र पंकजाताई मुंडे यांनी आपले राजकीय वजन वापरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून बीड जिल्ह्यातील रस्त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत सिमेंटचे रस्त्यासाठी निधी मंजूर करून आणला गेली पाच वर्षात बीड जिल्ह्यातील एकही राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता गुत्तेदाराने पूर्ण केला नाही अख्या पाच वर्षात एकदाही राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते पूर्ण का होत नाहीत या संदर्भात खासदारांना विचारणा करावीशी का वाटली नाही ? उलट बीड जिल्ह्यातील  जलजीवन मिशन योजना चांगली असताना गुत्तेदारांनी योजना हडप केली त्या गुत्तेदाराची प्रलंबित देयके अदा करावी म्हणून बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासनासोबत जिल्ह्याच्या खासदार यांनी अनेक वेळा बैठका घेऊन प्रश्न गुत्तेदारांचा मार्गी लावला मात्र पाच वर्षात अपूर्ण रस्त्यामुळे हकनाक शेकडो नागरिकांचा बळी गेला खासदार डॉ प्रीतम ताईंना कधीही अशा निगरगट्ट गुत्तेदार व गेंड्याची कातडी पांघरून झोपी गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रशासनाला जाब विचारावा का वाटला नाही असाही आता नागरिक सवाल करत आहेत 

एवढेच नाही आंबेजोगाई पासून जवळच असलेल्या पिंपळा धायगुडा येथील दूरदर्शन केंद्र बंद झाल्याने त्या ठिकाणी एफएम सेंटर सुरू करावे म्हणून आंबेजोगाई चे पत्रकार डॉक्टर खासदार मुंडे कडे निवेदन घेऊन गेले त्यावेळी खासदारांनी या प्रश्नापासून आपण अनभिज्ञ असल्यागत भूमिका घेतली होती केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने आंबेजोगाई आकाशवाणीच्या नावाने एफएम सेंटरला मंजुरी दिली पंतप्रधानाच्या हस्ते या फिल्म सेंटरचे उद्घाटन झाले त्या कार्यक्रमाला खासदारांनी परळीत असूनही कार्यक्रमाला येण्याचे टाळले असल्याचे समजते