बीड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे का ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-
बीड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महा यूतीचे सर्व नेते, पालकमंत्री धनंजय मुंडे सह सर्वजण कामाला लागल्याचे चित्र सर्वत्र बीड जिल्ह्यात दिसत आहे महाविकास आघाडीच्या वतीने बजरंग सोनवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी मिळाली आहे महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल भैया सोनवणे आघाडीच्या उमेदवारापासून दूर का ?अशीही चर्चा होत आहे
भाजपाचे नेते रमेशराव आडसकर व राजेसाहेब देशमुख हे आपसात नातेवाईक आहेत गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आडसकर यांनी विनंती केल्यामुळे राजेसाहेब देशमुख यांनी उमेदवारी परळी मतदार संघातून परत घेतली होती केज तालुक्यात आडसकर - सोनवणे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख बजरंग सोनवणे यांना उमेदवारी झाल्यापासून कुठेही त्यांच्यासोबत राजकीय व्यासपीठावर दिसले नाहीत यामुळे राजकीय क्षेत्रात कुजबूज सुरू आहे दुसरी विशेष बाब म्हणजे बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष बजरंग सोनवणे व राजेसाहेब देशमुख दोघेही होते त्यावेळी दोघांमध्ये अनेक वेळा बेबनाव झाल्याची चर्चा होती. खासदार रजनीताई पाटील यांनी परवा केज येथे काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही खासदार रजनीताई पाटील यांचे सुपुत्र आदित्य पाटील ,राहुल भैया सोनवणे पशुपतिनाथ दांगट यासह काँग्रेस पक्षाचा कोणीही प्रमुख कार्यकर्ता आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासोबत आज पावेतो तरी दिसला नाही यामुळे राजकीय क्षेत्रात शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत