मुस्लिम समाजाचे नेतृत्व वयोवृद्ध झाल्याने तरुणांनी पुढे आले पाहिजे

सब टायटल: 
रमजान ईदच्या निमित्ताने शहरात ना लाईट ना पाणी मग काय कामाचे नेते
Sampadkiya

.मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या एकमेव मागणीच्या निमित्ताने मराठा समाजातील अनेक प्रस्थापित नेत्याचे बंगले सुनसान करून टाकले जरांगे पाटलाच्या मागे मराठा समाजातील तरुण उभा राहिला त्यामुळे मराठाच नव्हे तर इतर समाजातील प्रस्थापित नेत्यांना जरांगे पाटलासमोर हात जोडून उभा राहून म्हणावे लागले कस काय पाटील तुम्ही म्हणताल तसे फक्त मराठा समाजातील नेतेच जरांगे पाटलांनी सरळ केले असे नाही तर सर्वच पक्षाचे आमदार, खासदार ,मंत्री स्वतःच्या पक्ष नेतृत्वाबद्दल त्यांच्या मनात जेवढी भीती नाही तेवढी भीती मनोज जरांगे पाटील यांची आहे कारण काय तर त्यांनी नुसता इशारा केला तरी मराठा समाजातील तरुण रस्त्यावर उतरून नेता कितीही मोठा असला तरी त्याची 50 लाखाची गाडी उभी करून जाब विचारत आहेत पटले नाही तर परत जा च्या घोषणा देऊ लागतात मराठा समाजाच्या तरुणांनी जरांगे पाटील यांच्या मागे शक्ती निर्माण केली आज लोकसभा निवडणूक सुरू आहे चर्चा कोण निवडून येणार याची नसून मराठा समाज कोणत्या उमेदवाराच्या बाजूने उभा आहे याची चर्चा जास्त होते मुस्लिम समाजाचा विचार केला तर मुळात बीड जिल्ह्यातील बीड गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई ,केज ,धारूर या शहरात मुस्लिम समाजाची संख्या दखलपात्र असूनही नेतृत्व वयोवृद्ध झाल्याने कोणीही दखल घ्यायला तयार नाही वयोवृत्त नेते आपली पेन्शन योजना सत्ताधारी पक्षाकडून सुरू करून गप्प बसले आहेत सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी मुस्लिम समाजात नेतृत्व शिल्लक नाही असेच म्हणावे लागेल कालची घटना अंबाजोगाई शहराचा विचार केला तरी रमजान ईद सारखा सण असताना रात्री बारा वाजेपर्यंत लाईट शहर व ग्रामीण भागात सुद्धा नव्हती हा क्षुल्लक  प्रश्न असला तरी रमजान ईद सणाच्या पूर्वसंध्येला रात्री महिला रात्रभर जागरण करत स्वयंपाक करतात बारा वाजेपर्यंत लाईट नसेल तर कसे करणार स्वयंपाक दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक ईदच्या पूर्व संध्येला नगरपरिषदेच्या मार्फत अंबाजोगाई शहरात पाणीपुरवठा यापूर्वी केला जात होता यावेळी तोही झाला नाही या सार्वजनिक प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारणारा एकही मुस्लिम नेता समाजात शिल्लक राहिला नसल्याची चर्चा होत आहे जे मुस्लिम समाजाचे स्वतःला तारनहार समजतात किंवा भास निर्माण करतात त्यांनीही काल लाईटचा प्रश्न असो नाहीतर पाणीपुरवठ्याचा प्रश्न असो ब्र शब्द सुद्धा तोंडातून काढला नाही समाजाने आपल्या व्यथा मांडायच्या कोणाकडे त्यासाठी मुस्लिम समाजाचे नेतृत्व वयोवृद्ध झाल्याने आता तरुणांनी पुढे आले पाहिजे अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे येणाऱ्या काळात तरुण नेतृत्व पुढे येते की पुन्हा वयोवृद्ध नेतृत्वाच्या पाठीशी समाज उभा राहतो हे पाहावे लागेल