सिटीस्कॅन मशिन सुरू करण्याच्या प्रयत्नात प्रभारी डीन डॉ धपाटे यशस्वी

सब टायटल: 
मात्र पुन्हा मशीन मधला एक पार्ट निकामी झाल्याने प्रयत्नाला बसली खीळ
Arogya Shikshan

.

                अंबाजोगाई (प्रतिनिधी)- 

स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय व महाविद्यालयाचे अनेक विभाग आहेत त्या सर्व विभागावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी डीन यांच्यावर असते हे जरी खरे असले तरी सिटीस्कॅन मशीन चार-पाच महिन्यापासून बंद आहे ती सुरू करण्यासाठी प्रभारी डीन डॉ धपाटे यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर त्या प्रयत्नात यशस्वी झाले मात्र मशीन सुरू झाल्यानंतर पुन्हा मशीन बंद झाली एक पार्ट निकामी झाल्याने प्रभारी डीन यांच्या प्रयत्नाला खिळ बसली असली तरी डॉ धपाटे म्हणतात मार्ग काढून सिटीस्कॅन मशीन सुरू होईल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला

       सिटीस्कॅन मशीनची लाईफ संपल्यामुळे नवीन मशीन खरेदीचा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडे डीन ऑफिसने प्रस्ताव दिला आहे मात्र लाल फितीच्या कारभारामुळे नवीन सिटीस्कॅन मशीन खरेदी झाली नाही अंबाजोगाई सह अनेक शासकीय रुग्णालयात अशीच अवस्था निर्माण झाली आहे प्रशासकीय पातळीवर तत्कालीन डीन यांनी सिटीस्कॅन मशीन संदर्भात जो पाठपुरावा करावयास हवा होता तो प्रयत्न केला असल्याचे दिसत नाही त्यामुळे आजपर्यंत मशीन सुरू झाली नाही अनेक वेळा सिटीस्कॅन मशीन बंद असल्याबाबत आवाज उठवण्यात आला मात्र दिशाभूल करणारी माहिती देऊन वेळ काढूपणाचे धोरण तत्कालीन डीन यांनी अवलंबले होते नवीन मशीन खरेदीसाठी उशीर होत असल्याने जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून ८० लाख रुपयाचा निधी सिटीस्कॅन मशीन दुरुस्तीसाठी दिला मात्र मशीन सुरू झाली नव्हती

प्रभारी डीनच्या प्रयत्नाला आले यश

        तत्कालीन डीन पदावरून  सेवानिवृत्त झाल्यानंतर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाच्या प्रभारी डीन पदी डॉ धपाटे यांची नियुक्ती झाली ते अनेक वर्षापासून याच रुग्णालयात कार्यरत असल्याने प्रशासकीय निर्णय घेण्यास त्यांनी सुरुवात केली पहिल्यांदा सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यासाठी डीन डॉ धापाटे यांनी संबंधित कंपनीशी संपर्क करून दुरुस्ती करणारे तज्ञ बोलावले त्यांचा पूर्वीचा व चालू वार्षिक कराराची जवळपास 46 लाख रुपये देणे होते अर्धी आता व अर्धे तीन महिन्यानंतर देण्याचा करारावर सिटीस्कॅन मशीन दुरुस्त करून घेतली सिटीस्कॅन मशीन सुरू होताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला सिटीस्कॅन मशीन सुरू झाल्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही पुन्हा सिटीस्कॅन मशीन बंद पडली पुन्हा मेकॅनिक यांनी तपासणी केली त्यावेळी एक पार्ट पूर्णतः निकामी झाल्याचे समोर आले प्रभारी डीन डॉ धपाटे यांनी मेकॅनिक तसेच सहकार्याशी  चर्चा करून त्यातूनही मार्ग काढलाय इतर रुग्णालयातील ज्या सिटीस्कॅन मशीन स्क्रॅपमध्ये काढल्यात त्या मशीन मधील आवश्यक असणारा पार्ट जो अंबाजोगाईच्या मशीनला उपयोगी येतो तो आणण्याची परवानगी आयुक्तांना त्यांनी मागितली आहे परवानगी मिळताच तो पार्ट उपलब्ध होईल अंबाजोगाईच्या रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन त्यानंतर सुरू होईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाला अशाच प्रयत्नवादी डीनची आवश्यकता होती प्रभारी डीन डॉ धपाटे यांच्या सिटीस्कॅन मशीन सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातून त्यांचा तो दृष्टिकोन सर्वसामान्य जनता रुग्णाला दिसला त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे