रिटायर्ड डीन यांनी सहा लाख रुपयांच्या पाण्याच्या टाक्या खरेदीचे आदेश दिले मात्र टाक्या बसवल्या कुठे कोणालाच पत्ता नाही

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातील सिटीस्कॅन मशीन बंद का ? तर त्यासाठी लागणारा फंड उपलब्ध नाही पिण्याचे पाणी रुग्ण व नातेवाईकांना मिळत नाही दुसरीकडे पाण्याच्या टाक्याची खरेदी जाता जाता रिटायर्ड डीन यांनी महाविद्यालय विभागासाठी सहा लाख रुपयांची खरेदी केली मग त्या सहा लाखाच्या पाण्याच्या टाक्या आहेत कुठे ? कोणाला थांग पत्ता लागत नसल्याचे समजते रुग्णालय व महाविद्यालय विभागात डीन ऑफिसमध्ये गेली अनेक वर्षापासून कार्यरत असणारा कंत्राटी डोम कावळ्याच्या शिफारशीवरून सेवानिवृत्त होताना डीन यांनी लाखो रुपयांच्या खरेदीचे आदेश दिल्याने या बोगस आदेशाची चौकशी होऊन कार्यवाही अशी जनतेतून मागणी होत आहे
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय सिटीस्कॅन मशिन दुरुस्ती अभावी सहा महिने झाले बंद आहे त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी यांनी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला त्यात आणखीन 40 लाख रुपयांची गरज आहे म्हणून आज पावेतो ती मशीन सुरू झाली नाही सिटीस्कॅन मशीन सुरू होणे महत्त्वाचे होते की सहा लाख रुपयांच्या टाक्या खरेदी करणे महत्त्वाचे होते चार महिन्यापासून गोरगरीब रुग्णाचे किती नुकसान झाले त्याचा अंदाज बांधता येणार नाही सिटीस्कॅन मशीन निधी अभावी दुरुस्त होत नाही दुसरीकडे आपण सेवानिवृत्त होत आहोत आपल्याला देणे घेणे नाही येणारा डीन बघेल सिटीस्कॅन मशीन सुरू करायची की नाही या भूमिकेतून तत्कालीन डीन यांनी रुग्णाच्या हितापेक्षा स्वतःचे तसेच कंत्राटदार, कंत्राटी डोमकवळ्याचे हित जोपासत अनावश्यक बाबीवर लाखो रुपये खर्च करत पाण्याच्या टाकीचे खरेदीचे आदेश दिले विद्यमान डीन यांनी सदरील बोगस खरेदी तात्काळ थांबवून तो निधी रुग्णसेवेसाठी वापर करावा अशी जनतेतून मागणी होत आहे
कंत्राटी डोणकावळा खरेदी समितीवर कसा ?
अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयाचे प्रशासन चालवणाऱ्या टीम सोबत कंत्राटी डोमकावळा सतत घोंगावत असतो त्याला अनेक वेळा इतर रुग्णालयात पदावर नियुक्तीचे आदेश आले मात्र हा डोमकावळा त्या रुग्णालयाकडे गेला नाही कारण अंबाजोगाईच्या डीन ऑफिसच्या मार्फत होणारी लाखो , करोडो रुपयांची खरेदी असो की विविध समित्या नियुक्त केल्या त्या प्रत्येक समितीवर हा डोमकावळा नियुक्त आहे त्यामार्फत प्रत्येक विभागामार्फत होणारी खरेदी असो इतर प्रत्येक बाबीवर बारकाईने तो लक्ष ठेवून असतो डीन अथवा प्रोफेसर, सहाय्यक प्राध्यापकाकडे एवढ्या महागड्या गाड्या नसतील तेवढ्या महागड्या गाड्या हा डोमकावळा वापरतो कंत्राटी पदावर कार्यरत कर्मचाऱ्याला पगार किती ? मग हे ऐश्वर्य येते कुठून ? अशी ही कुजबूज रुग्णालय परिसरात ऐकवास मिळत आहे
असाच प्रकार छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात सुद्धा होता त्या ठिकाणी असणाऱ्या डोंकावळ्याची खुर्ची बिनच्या बाजूला होती पत्रकारांनी मंत्र्याकडे मुद्दा उपस्थित करतात मंत्र्यांनी डीनला खडसावले त्यानंतर ती खुर्ची हटवली गेली कंत्राटी कर्मचाऱ्याला कोणतेही व्यक्ती अधिकार देता येत नाहीत बिलावर सह्या हा डोमकावळा करायचा घाटी रुग्णालयाच्या 23 समित्यावर तो नियुक्त होता आंबेजोगाईच्या डीन यांनी आपल्या अधिकार कक्षेत तीन उपाधीस्थता यांची नियुक्ती केली आहे तशीच नियुक्ती त्यावेळच्या घाटीच्या डीन यांनी डोमकावळ्याची उपाधीस्थता पदी नियुक्ती केली होती घाटीच्या डीनपदी डॉक्टर शिवाजीराव सुक्रे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी त्या कंत्राटी डोंकावळ्याला तातडीने निलंबित केले आता आंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयाची डीन यांनी सदरील कंत्राटी डोंकावळ्याला तातडीने विविध खरेदी समिती त्यावरून बरखास्त करून बोगस खरेदीची चौकशी करून दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी जनतेतून होत आहे प्रभारी डीन काय भूमिका घेतात येणाऱ्या काळात दिसेल