प्रभारी डीन यांनी डॉ बिराजदार, डॉ हंडरगुळे, डॉ बगाटे यांची उपाअधिष्ठता पदी केलेली नियुक्ती आदर्श आचारसंहितेचा भंग तर नव्हे ना ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
सध्या लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे त्यामुळे निवडणूक विभागाने यापूर्वीच पत्रकार परिषदा घेऊन सुचित केलेले असताना अचानक अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व महाविद्यालयाचे प्रभारी डीन यांनी डॉ बिराजदार, डॉ हंडरगुळे डॉ बगाटे या तीन डॉक्टरांना उपअधिष्ठाता पदी नियुक्ती दिल्याच्या समाज माध्यमावर बातम्या झळकत आहेत आदर्श आचारसंहिता लागू असताना प्रभारी डीन यांना असे आदेश काढता येतात का? आले असतील तर आचारसंहितेचा हा भंग तर नव्हे ना ? अशी चर्चा होत असून जिल्हाधिकारी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करण्याची जनतेतून मागणी होत आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व प्रशासकीय यंत्रणेला आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर बीड येथे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्हास्तरावर तसेच अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी अंबाजोगाई येथे पत्रकार परिषद घेऊन विविध शासकीय कार्यालय तसेच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे अशा सूचना केल्या त्यानंतर अंबाजोगाई नगर परिषदेच्या यंत्रणेने शहरातील विद्युत खांबावरील झेंडे काढले फलक झाकले गेले अंमलबजावणी सुरू झाली
काल अचानक अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाचे प्रभारी डीन यांनी त्यांना असलेल्या अधिकारात तीन डॉक्टरांना उपअधिष्ठता पदावर नियुक्ती दिल्याच्या बातम्या झळकल्या आदर्श आचार संहिता सुरू असताना असे धोरणात्मक निर्णयाचे आदेश काढता येतात का ? डीन यांनी निवडणूक विभागाशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवे होते विशेष म्हणजे रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे विभाग प्रमुख डॉ बिराजदार गेली अनेक वर्षापासून अंबाजोगाई येथेच कार्यरत आहेत विविध राजकीय पक्षाचे नेते ,कार्यकर्ते, व्यापारी यांच्या ते गळ्यातील ताईत आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी यांनाही उपअधिष्ठाता पदी नियुक्ती मिळाल्याचे समजते सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे त्यासोबत डॉ बगाटे अशा तीन डॉक्टरांना भलेही पदवीधर व पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थी संदर्भात ते कामकाज करणार असले तरी आदर्श आचारसंहिता सुरू असताना अशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेता येत नाही असे निवडणूक विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी ,उपजिल्हाधिकारी ,तहसीलदार सांगतात मग अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाचे प्रभारी डीन यांनी आचारसंहितेच्या काळामध्ये उप अधिष्ठाता पदी डॉक्टरांच्या नियुक्ती करता येतात काय ? याची चौकशी व्हावी अशी जनतेतून मागणी होत आहे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार काय भूमिका घेतात येणाऱ्या काळात दिसेल