समाज म्हणतो तुम्ही उमेदवार व्हा;दोडतले म्हणतात उमेदवारी नको पाठिंबा देऊ

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
यशवंत सेनेच्या बहुतांश कार्यकर्ते व नेत्यांना वाटत होते राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी बीड लोकसभेची निवडणूक लढवावी समाजाची ताकद दाखवावी यावर निर्णय घेण्यासाठी दोडतले यांच्या चतुरवाडी गावात यशवंत सेनेचा मेळावा दोडतले यांनी बोलावला सर्व वक्त्यांनी आपली भूमिका मांडली मात्र दोडतले यांनी अचानक लोकसभा निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या उमेदवारांना फोन करून निवडणूक लढवण्याऐवजी यशवंत सेनेचा पाठिंबा देण्याची भूमिका घेतली यामुळे हाय व्होल्टेज ड्रामा झाला कोणत्याही निर्णयाविना मेळाव्याची सांगता झाल्याचे समजते
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बालासाहेब दोडतले यांनी काही दिवस उपोषण केले मोर्चा काढला त्यामुळे यशवंत सेनेचे कार्यकर्ते व नेत्यांना बाळासाहेब दोडतले यांनी लोकसभा निवडणूक लढवून समाजाची ताकद दाखवावी असे वाटत होते समाजातील तरुण कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्याने आपल्या मूळ गावी चतुरवाडी येथे समाजाचा मेळावा बोलावला यावेळी उमेदवारांना फोन लावण्यात आले दोडतलेचे म्हणणे होते आरक्षण मिळवणे हा आपला उद्देश असून निवडणूक लढवणे हा आपला उद्देश नाही किंवा मी कधीही निवडणूक लढवायची अशी भूमिका घेतली नाही त्यामुळे आपल्या समाजाला आरक्षणाची जो हमी देईल त्याला समाजाने पाठिंबा द्यावा त्या दृष्टीने त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमाला पाचारणही केले होते मेळाव्यात कोणीही पाठिंबा द्यावा असे मत व्यक्त केले नसताना स्वतःच फोन करून पाठिंबा जाहीर करण्याचा पूर्ण ताकदीने बालासाहेब दोडतले यांनी प्रयत्न केला मात्र त्यांना यात पूर्ण यश आले असे दिसत नाही अशीही चर्चा होत आहे आता आगामी लोकसभा निवडणुकीत यशवंत सेनेची भूमिका काय ? असाच प्रश्न सर्वत्र केला जात आहे बघूया काय होते ते !