मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्याने राजकारणातील अनेक दिग्गज अस्वस्थ

.
राजकारणात एकमेकाचे विरोधी कधी एकत्र येतील ते एकत्र आल्याने अनेकांना आपला मार्ग बदलावा लागतोय याला तर राजकारण म्हणतात राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हणतात नव्हे बीड जिल्हा सध्या हे अनुभव अनुभवतो आहे मुंडेचे कुटुंब पवारांनी फोडले असा आरोप त्यावेळी झाला धनंजय मुंडे राष्ट्रवादीवासी झाले पंकजाताई मुंडे राज्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्या धनंजय मुंडे त्यावेळी विरोधी पक्षनेते होते त्यानंतर डॉ प्रीतम ताई मुंडे जिल्ह्याच्या खासदार झाल्या कोणालाही वाटले नव्हते बहिण- भाऊ पुन्हा राजकारणात एकत्र येतील पालकमंत्री धनंजय मुंडे यांचेशी राजकीय मतभेद असणाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपामध्ये आपली घुसमट होते आहे असे वाटणाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश केला. बघत बघत राजकारणात एवढ्या गतीने बदल झाले की कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही जी अशक्य बाब होती तीही शक्य झाली अखंड असणारा परिवार शरद पवाराचे घरही फुटले काका विरुद्ध पुतण्याने बंड करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी भाजप सोबत युती केली त्यामुळे भाजप, शिंदे गट ,अजित पवार गट एकत्र आले शरद पवार गटात राहणे काहींनी नाईलाज का म्हणून होईना पसंत केले
लोकसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढणार असे जाहीर झाल्यानंतर निवडणुका ही जाहीर झाल्या विशेष म्हणजे भाजपाने विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांचे तिकीट कापून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी दिली हो नाही म्हणत त्यांनी जिल्ह्यात मतदारांशी संपर्क सुरू केला परळीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांचा भव्य सत्कार केला आता निवडणुकीची पूर्ण धुरा पालकमंत्र्याच्या खांद्यावर आली यामुळे आता खरा कस लागणार आहे बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा पेच आहे मात्र सर्वात जास्त पेच केज, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात दिसतो भाजपासोबत आम्ही कधीही तडजोड केली नाही करत नाही असा डांगोरा पीटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना भाजपाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मते द्या म्हणून मतदारासमोर आता यापुढे जावे लागेल पालकमंत्री धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, प्रीतमताई मुंडे आपल्या समर्थकांना कसे समजावून सांगणार झाले गेले विसरा आता पंकजाताईंना निवडून आणायचे दुसरीकडे अनेक दिग्गज नेते भाजपा असो की राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याची गोची झाली सांगणार कोणाला ? फुलचंद कराड यांनी आपल्या भावना समाज माध्यमावर व्यक्त केल्या आहेत त्या भावनाशी किती जण सहमत होतात पाहावे लागेल मात्र बहिण - भाऊ एकत्र आल्याने केज, अंबाजोगाई, परळी तालुक्यातील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दिग्गज नेते अस्वस्थ असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे