सायगावच्या ग्रामपंचायतचा विरोध झुगारून गुत्तेदाराने केले बोगस काम

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
सायगाव ता. अंबाजोगाई या गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम बोगस होत असून सदरील कामाचे बिल अदा करू नये असा तक्रारी अर्ज सय्यद अहमद अली हाश्मी तसेच ग्रामपंचायत सायगाव सदरील काम रोखण्यासंदर्भात ठराव घेऊन बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले आहे मात्र प्रशासनाने काय भूमिका घेतली ही अद्यापही गावकऱ्यांना समजलेले नाही
अंबाजोगाई तालुक्यातील सायगाव गावात सुरू असलेले घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कामाची किंमत 35 लाख 37 हजार 632 रुपये एवढी असून या कामाचे कंत्राटदार श्रीमती पूजा आसाराम तांदळे रा. अंबाजोगाई आहेत सदरील कंत्राटदाराने कार्यारंभ आदेशातील अटी व शर्ती नुसार ही काम केले नसल्याचा तक्रारीत मुद्या नमूद आहे घनकचरा व सांडपाण्याचे काम ग्रामपंचायतच्या जागेत करणे बंधनकारक असताना खाजगी लोकांच्या जागेत सदरील काम केले असल्याचे म्हटले आहे खाजगी व्यक्तीचे दानपत्र न घेता गुत्तेदाराने काम केले कसे ? गट क्रमांक 164 जागेचा वाद न्यायालयात सुरू असल्याचेही म्हटले आहे गुत्तेदाराने या वादग्रस्त जागेत कचराकुंडीचे काम कशाच्या आधारे केले विशेष म्हणजे ज्या जागेत गुत्तेदार याने सदरील काम सुरू केले या संदर्भात सरपंचांना कुठलाही विश्वासात न घेता सदरील कामे सुरू केल्याचे म्हटले आहे दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामपंचायतने या कामासंदर्भात ठराव घेतला असून या ठरावाची प्रतही तक्रारी सोबत तक्रारदार सय्यद अहमद अली हाश्मी यांनी जोडून बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे प्रशासनाने तक्रारीची दखल न घेतल्यास या मागणीसाठी गावकरी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे
अंबाजोगाई तालुक्यातील जलजीवन योजनेची कामे असो अथवा इतर कोणत्याही गुत्तेदार संदर्भात सरपंच व ग्रामपंचायत ने तक्रार दिली तरी अंबाजोगाई पंचायत समिती मार्फत तक्रारीची कुठलीही दखल घेतली जात नाही बोगस बिले प्रथम प्राधान्याने गुत्तेदारांना अदा केली जातात अशा सरपंचाच्या तक्रारी आहेत बीडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अंबाजोगाई तालुक्यातील सरपंच व सदस्यांची संयुक्त बैठक घेऊन सरपंच व सदस्यांच्या व्यथा ऐकाव्यात अशी मागणी सरपंच व सदस्याकडून केली जात आहे