बालासाहेब दोडतलेनी बीड लोकसभा लढवली तर जोगाईवाडी ग्रामपंचायतचे काय होणार ?

.
अंबाजोगाई (प्रतिनिधी)-
सध्या बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाली आहे भाजपाच्या उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे यांचे नाव जाहीर झाले आहे मविआच्या वतीने बजरंग सोनवणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते यशवंत सेनेचे अध्यक्ष बालासाहेब दोडतले हेही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे खरेच दोडतले उमेदवार म्हणून येतील ? असा प्रश्न केला जात आहे जोगाईवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर भाजपाच्या आमदार मुंदडांच्या गटाच्या पाठिंब्यावर सौ दोडतले सरपंच पदावर असल्याने थेट भाजप उमेदवाराच्या विरुद्ध दोडतले निवडणूक रिंगणात उतरल्यास जोगाईवाडी ग्रामपंचायत मध्ये काय होईल ? अशी ही चर्चा सध्या सुरू आहे
बालासाहेब दोडतले व महादेव जानकर यांनी महाराष्ट्रात संघटन उभे केले मात्र कुठे माशी जिंकली माहित नाही दोघांनी आपापला मार्ग स्वतंत्र निवडला शरद पवारांची जानकर यांनी भेट घेतली मात्र माढाची उमेदवारी मिळाली नाही ते पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले त्यांना आघाडीत सामील करून घेण्यात आले त्यांना मराठवाड्यातील एक जागा सोडणार असल्याचीही चर्चा आहे ती जागा कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे यांना उमेदवारी भाजपाने जाहीर केली सध्या पंकजाताई मुंडे व पालकमंत्री धनंजय मुंडे संयुक्तरीत्या सभांना त्यांनी सुरुवात केल्याची दिसत आहे मराठा समाजाचा अपक्ष उमेदवार येणार आहे एकूण बीड लोकसभेची निवडणूक पंकजाताई मुंडेंना सोपी जाते की कस लागतो येणारा काळच सांगेल
दोडतलेच्या उमेदवारीनंतर जोगाईवाडीचे काय ?
महादेव जानकर पंकजाताई मुंडेचे मानलेले भाऊ आहेत दुसरीकडे यशवंत सेनेचे बालासाहेब दोडतले जानकर पासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी जोगाईवाडी ग्रामपंचायतची सत्ता भाजपाचे आमदार मुंदडा गटाच्या सहाय्याने त्यांच्या सौभाग्यवतीना सरपंच पदावर आरूढ केले आहे भाजपा गटाला उपसरपंच पद आहे सरपंच पतीने बीड लोकसभेची उमेदवारी अर्ज भरून पंकजाताई मुंडे यांना निवडणुकीत आव्हान दिल्यास अंबाजोगाई शहरालगत असणाऱ्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतच्या सत्तेचे काय होईल ? लोकसभेच्या उमेदवारीमुळे जोगाईवाडी ग्रामपंचायतच्या सत्तेत सत्तांतर होईल का ? की यावर डोळे झाक केली जाईल येणारा काळच ठरवेल मात्र बालासाहेब दोडतले लोकसभेचे उमेदवार म्हणून आले तर जोगाईवाडीच्या युतीवर परिणाम नक्की होईल अशी चर्चा सुरू आहे