पळून जाऊन परत येणाऱ्या पेक्षा निष्ठावंतांना लोकसभेची उमेदवारी द्यावी मागणी

सब टायटल: 
अंबाजोगाईतील बंडाला शरद पवार कसे करणार थंड का होणार बंडच !
Rajkiya

.

        अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

               राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील केजचे बजरंग बप्पा सोनवणे यांनी ऐन लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटात प्रवेश केला खरे तर प्रवेश होण्याअगोदर अंबाजोगाईतून बंडाचे निशाण फडकवले जाणार होते मात्र त्या दिवशीची नियोजित बैठक रद्द करून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वजण प्रवेशाच्या सोहळ्याला पुण्याला हजर होते त्या ठिकाणी सर्वांनी बजरंग बप्पा यांचे अभिनंदन केले मात्र अंबाजोगाईत आज निष्ठावांताच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक झाली निष्ठावांताच्या नावाखाली बंडाचा झेंडा फडकवत लोकसभेचे उमेदवारी डॉ नरेंद्र काळे यांनाच द्यावी असा ठरावही या बैठकीत झाला अंबाजोगाईतील पक्षांतर्गत गटबाजीचे बंड शरद पवार कसे थंड करतात की बंडच कायम राहते हा चर्चेचा विषय बनला आहे

              मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर बीड जिल्ह्यात बहुतांशी नेते अजित पवार गटात गेले होते त्यामुळे शरद पवारांच्या गटात मोजके लोक शिल्लक होते लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी पवारांनी डॉ काळे ,मोराळे, गायकवाड, मुंडे आदींना लोकसभेच्या कामाला लागण्याचे आदेश दिले सर्वजण जिल्ह्यात फिरू लागले बजरंग सोनवणेचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले आपल्याला उमेदवारी मिळू शकत नाही बाकी इतर सर्व गप्प बसले मात्र डॉ नरेंद्र काळे यांचा आत्मसन्मान जागा झाला आपणच कसे निष्ठावंत आहोत त्यामुळे आपल्यालाच लोकसभेची उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी निष्ठावान याच्या नावाखाली बैठक बोलावून आपली भूमिका जाहीर केली सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉ नरेंद्र काळे स्वतःला शरद पवार यांचे निष्ठावंत मानत असतील तर पक्ष नेतृत्वाच्या विरोधी भूमिका घेणे बंड नाही का ? अशीही अंबाजोगाई शहरात चर्चा होत आहे

            दुसरे महत्त्वाचे म्हणजे आजच्या बैठकीत दुसरा महत्त्वाचा ठराव घेतला तो म्हणजे नियुक्त पदाधिकारी यांना पूर्ण कालावधी मिळावा आजच्या मेळाव्यात केज मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना पूर्ण कालावधी मागितला जात आहे याचा अर्थ ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या त्या रद्द होण्याची भीती निष्ठावांतांना निर्माण झाली आहे का ? सर्वात महत्त्वाचे म्हणजे बजरंग सोनवणे यांचा पक्षप्रवेश शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाला आहे त्या बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी का ? त्यांना यापूर्वी अनेक वेळा संधी मिळाली त्यांच्या पत्नीला संधी मिळाली मुलीला मिळाली सर्वात गंभीर आरोप म्हणजे ज्यांनी भाजपाला मदत केली नाही अशांना बीड लोकसभेची उमेदवारी द्या असे म्हणणे पक्ष नेतृत्वाविरुद्ध बंड नाही का ? एकीकडे निष्ठावंत म्हणायचे दुसरीकडे बंडाचे निशाण फडकवायचे याला निष्ठावंत म्हणतात का ? असाही खोचक सवाल राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर करत आहेत बघू अंबाजोगाईतून निर्माण झाले की केले माहीत नाही बंड शमते की कायम राहते येणारा काळच ठरवेल असे दिसते