बीड लोकसभा मतदारसंघातून आघाडीची उमेदवारी ज्योतीताई मेटे की बजरंग सोनवणे ?

सब टायटल: 
केज मधील मातब्बर नेते व कार्यकर्त्यांचा उद्या होणार जाहीर प्रवेश
Rajkiya

.

                     अंबाजोगाई (प्रतिनिधी)-

                      बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी पंकजाताई मुंडे यांना जाहीर झाल्यानंतर त्यांना टक्कर कोण देणार ज्योतीताई मेटे की बजरंग सोनवणे ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे विशेष म्हणजे बजरंग सोनवणे यांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होत असताना पालकमंत्री धनंजय मुंडे यांची बजरंग सोनवणे यांची भेट झाल्याने प्रवेशाची चर्चा पुन्हा थंडवली त्या दरम्यान ज्योतीताई मेटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असताना पुन्हा बजरंग सोनवणेच्या प्रवेशाने आता बीड लोकसभेची आघाडीची उमेदवारी कोणाला ज्योतीताई मेटे की बजरंग सोनवणे ? असा पेच निर्माण झाल्याची समजते

              राजकारणात काहीही अशक्य नाही असे म्हणतात ते खरेच आहे उमेदवारी देताना विचार करूनच द्यायचा असा निश्चय शरद पवारांनी केल्याचे दिसत आहे ज्योतीताई मेटे यांना सर्व प्रक्रिया पूर्ण करायला लावल्या तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांचा उद्या कार्यकर्त्यासह शरद पवार गटात प्रवेश होणार असल्याचे समजते अधिकृतपणे त्यांनी प्रवेशाची पुष्टी केलेली नाही भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना सर्वाधिक मतदान मिळेल असे सर्वात प्रथम वक्तव्य माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळुंके यांनी केले ते अजित पवार गटाचे आमदार आहेत मराठा आरक्षणाचा मुद्दा बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस गरम होत असताना निवडणुका कशा पार पडतात हेच पहावे लागेल बजरंग सोनवणे असो नाहीतर ज्योतीताई मेटे फाईट तगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्यातील आमदाराचा यात कस लागणार एवढे मात्र निश्चित